अरबाजची गर्लफ्रेंड जॉर्जिया सोबत शहनाजच्या भावाने बाथटबमध्ये केला डान्स, व्हिडीओ व्हायरल
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 27, 2021 17:10 IST2021-04-27T17:09:15+5:302021-04-27T17:10:02+5:30
जॉर्जियाने शहबाजसोबत एक व्हिडीओ शेअर केला आहे, ज्यात दोघे बाथटबमध्ये थिरकताना दिसत आहे.

अरबाजची गर्लफ्रेंड जॉर्जिया सोबत शहनाजच्या भावाने बाथटबमध्ये केला डान्स, व्हिडीओ व्हायरल
अभिनेत्री शहनाज गिल छोट्या पडद्यावरील रिएलिटी शो बिग बॉस १३ मधून खूप लोकप्रियता मिळाली. तिने प्रेक्षकांचे खूप मनोरंजन केले. चाहत्यांनी सोशल मीडियावर तिच्यावरील प्रेम व्यक्त केले आहे. त्यानंतर ती रिएलिटी शो मुझसे शादी करोगेमध्ये दिसली होती. शहनाजला बिग बॉस १३नंतर बऱ्याच म्युझिक व्हिडीओ आणि चित्रपटांच्या ऑफर आल्या. तिने बरेच वजन घटविले आहे. तिचे ट्रान्सफॉर्मेशन हैराण करणारे आहे. मात्र आता तिचा भाऊ शहबाजदेखील हळूहळू सक्केसची शिडी चढतो आहे. स्वतःचे स्वप्न पूर्ण करते आहे.
मीडिया रिपोर्ट्सनुसार शहबाज बहेशाने अरबाज खानची गर्लफ्रेंड जॉर्जिया अँड्रियानीसोबत एका प्रोजेक्टसाठी हातमिळवणी केली आहे. दोघे एका म्युझिक अल्बममध्ये दिसणार आहे. जॉर्जियाने शहबाजसोबत एक व्हिडीओ शेअर केला आहे, ज्यात दोघे बाथटबमध्ये थिरकताना दिसत आहे. दोघे सीन पॉलचे गाणे टेंपरेचरवर डान्स करताना दिसत आहेत.
जॉर्जियाने व्हिडीओ पोस्ट शेअर करत लिहिले की, आम्ही करतो गोष्टी, ते पण कधी आपल्या पार्टनर इन क्राइमसोबत करते. जॉर्जियाने या व्हिडीओच्या हॅशटॅगमधून सांगितले की व्हिडीओ चंडीगढमध्ये शूट होणार आहे. शहबाज बदेशा या व्हिडीओत खूप फनी अंदाजात दिसतो आहे. तर जॉर्जिया डान्स करताना दिसते. जॉर्जियाच्या या व्हिडीओवर शहबाजने कमेंट करत लिहिले की, वाह. यासोबत त्याने लाल हार्टची इमोजी मेंशन केली आहे.