शाहरुख आश्‍चर्यकारक, काजोलही अद्भूत!

By ऑनलाइन लोकमत | Published: January 16, 2016 01:09 AM2016-01-16T01:09:23+5:302016-02-05T13:53:37+5:30

'दिलवाले'मधील तुझ्या भूमिकेविषयी काय सांगशील? मी या चित्रपटात इशिताची भूमिका केलीय. ती आधुनिक, स्वतंत्र आणि व्यवहारशील आहे. तिला जे ...

Shahrukh is amazing, Kajoli is awesome! | शाहरुख आश्‍चर्यकारक, काजोलही अद्भूत!

शाहरुख आश्‍चर्यकारक, काजोलही अद्भूत!

googlenewsNext
'
;दिलवाले'मधील तुझ्या भूमिकेविषयी काय सांगशील?
मी या चित्रपटात इशिताची भूमिका केलीय. ती आधुनिक, स्वतंत्र आणि व्यवहारशील आहे. तिला जे वाटतं ते चुकीचं असो वा बरोबर ती तडक बोलून मोकळी होते. तिच्यासाठी प्रामाणिकपणा हेच तिचे सर्वस्व आहे.

शाहरुख खान आणि काजोलसोबतचा अनुभव कसा राहिला?
अगदी जबरदस्त अनुभव होता. त्यांच्यासोबत चित्रपटात काम करणं म्हणजे जणू आनंदपर्व आहे. शाहरुख आश्‍चर्यकारक अन् काजोल अद्भूत आहे. ते दोघेही महान अभिनेते आहेत. माझ्यासाठी हा शिकण्याचा क्षण होता.
शाहरुख खान म्हणजे वेळेवर येणारा आणि तुम्हाला त्याच्यासोबत नेहमीच कम्फर्टेबल वाटेल असाच आहे. त्याच्यात प्रचंड ऊर्जा आहे. इतक्या वर्षानंतरही त्याच्यातील अभिनय पाहण्याजोगा आहे. काजोल ही सातत्यपूर्ण अभिनेत्री आहे. डोळ्याद्वारे ती सारं काही बोलत असते. पडद्यावर ती अगदी वेगळी दिसते.

तेलगू चित्रपट आणि बॉलिवूडच्या संस्कृतीची तुलना कशी करशील?
मला भाषेशिवाय वेगळं काही वाटलं नाही. तिथले तंत्रज्ञ आणि इथले अगदी तसेच आहेत. उद्योग, अनुभव, कल्पना सारे काही सारखेच आहे. तेलगू चित्रपट उद्योगात कॅमेरा हा अधिक बोलतो. इथेही तसंच आहे.

तुला दिलवाले चित्रपट कसा मिळाला?
मला रोहितच्या ऑफिसमधून कॉल आला होता. स्क्रीप्टबाबत माहिती देण्यात आली. स्क्रीप्ट वाचून मला आनंद झाला. ऐकतानाच मी हो म्हटलं, कारण नुसतं ऐकणे हा देखील सुंदर अनुभव होता. या चित्रपटासाठी मला कोणतीही ऑडिशन द्यावी लागली नाही.

तू बी. टेक. केलेय. तांत्रिक बाजू ते कला क्षेत्र कसा फरक करशील?
मी दुसर्‍या वर्षाला शिकत होते. मॉडेलिंगकडे मी छंद म्हणून पाहत होते. मला वाटले मी उत्कृष्ट नर्तक आहे. काही टी. व्ही. जाहिराती मी केल्या आहेत. परंतु मला कॅमेरा आवडतो.
जाहिराती करताना माझ्या लक्षात आले की मी अभिनय करू शकते. तेलगूमध्ये नवा चेहरा हवा होता. मी हैदराबादला गेले आणि माझी ऑडिशन झाली. काही दिवसानंतर माझी निवड झाल्याचा कॉल आला.

समीक्षक म्हणतात, तू 'स्टार इन द मेकिंग' आहेस?
असं ऐकायला मिळणे म्हणजे खरंच भाग्याचे लक्षण आहे. पहिल्या चित्रपटानंतर तुम्हाला असा अभिप्राय मिळणं नक्कीच कौतुकास्पद आहे. माझा पहिला चित्रपट पाहिल्यानंतर रसिक, समीक्षक आणि इंडस्ट्रीलाही तो आवडला.

दिलवालेमधला लक्षात राहणारा क्षण?
हैदराबाद येथे झालेले शूटिंग खूप मजेदार होते. रामोजी फिल्म सिटीमध्ये आम्ही राहत होतो. मी शाहरुख खान, काजोल आणि इतर अभिनेत्यांना भेटले. दोन्ही वरुण (वरुण धवल आणि वरुण शर्मा) यांच्याशी माझे संबंध खूप छान होते. सर्वच युनिट एका परिवाराप्रमाणे राहायचे. आम्ही सर्वजण एकत्र जेवण करायचो.

तुला कोणता खान अधिक आवडतो?
सलमान, शाहरुख हे दोन्ही खान उत्तम अभिनेते आहे.

अभिनयाच्या शाळेत प्रवेश घेतला होता का?
मी जेव्हा मुंबईला आले तेव्हा वाटलं होतं की प्रशिक्षण घ्यावं, मात्र यामुळे फायदा होणार नसल्याचं अनेकांनी सांगितलं. अभिनय शिकविला जाऊ शकत नाही, असे त्यांचे म्हणणे होते आणि ते खरेही आहे. म्हणून मग मी काही खासगी अभिनय कार्यशाळांचा अनुभव घेतला आणि त्या बळावरच आज मी इथे आहे. सुंदर चेहरा आणि उत्तम अभिनय याचा अप्रतिम संगम म्हणजे कृती सेनन. 'हिरोपंती'द्वारे रूपेरी पडद्यावर अवतरलेल्या या नायिकेने या सुंदरता व अभिनयाच्या बळावरच समीक्षकांसमवेत दिग्दर्शक आणि निर्मात्यांचेही लक्ष वेधून घेतले आहे. यावर्षीचा सर्वात मोठा आणि ज्या चित्रपटाची सिनेरसिक आतुरतेने वाट पाहत आहेत तो 'दिलवाले' आज प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटातही कृती महत्त्वाची भूमिका वठवत आहे. या निमित्ताने तिने सीएनएक्सला विशेष मुलाखत दिली. या मुलाखतीत तिने या चित्रपटातील अभिनेत्यांसमवेत काम करतानाचा तिचा अनुभव आणि बॉलिवूडमध्ये तिची एंट्री कशी झाली हे अगदी सविस्तर सांगितले.

Web Title: Shahrukh is amazing, Kajoli is awesome!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.