शाहरूख खानच्या या अभिनेत्रीला आला अश्लिल मॅसेज, मुंबई पोलिसांकडे मागितली मदत
By ऑनलाइन लोकमत | Published: July 25, 2019 12:01 PM2019-07-25T12:01:29+5:302019-07-25T12:02:13+5:30
‘कभी हां कभी ना’ या चित्रपटात शाहरुख खानसोबत झळकणारी ही अभिनेत्री दीर्घकाळापासून ग्लॅमर वर्ल्डपासून दूर आहे. पण अलीकडे सुचित्राने मुंबई पोलिसांना मदत मागितली आणि ती चर्चेत आली.
‘कभी हां कभी ना’ या चित्रपटात शाहरुख खानसोबत झळकणारी अभिनेत्री सुचित्रा कृष्णमूर्ती दीर्घकाळापासून ग्लॅमर वर्ल्डपासून दूर आहे. पण अलीकडे सुचित्राने मुंबई पोलिसांना मदत मागितली आणि ती चर्चेत आली. एका अनोळखी व्यक्तिकडून अश्लिल मॅसेज येत असल्याबद्दल सुचिताने पोलिसांकडे तक्रार केली.
या अश्लिल मॅसेजचे स्क्रिनशॉट सोशल अकाऊंटवर शेअर करत, तिने मुंबई पोलिसांना याप्रकरणाची दखल घेण्याची विनंती केली. ‘जेव्हा कुणी नॅशनल प्राईम प्रिव्हेन्शन कौन्सिलमध्ये काम करत असल्याचा दावा करतो आणि महिलांना अशाप्रकारे त्रास देतो... महाराष्ट्र सायबर आणि मुंबई पोलिस कृपया याकडे लक्ष द्या. हा मॅसेज मला फेसबुकवर पाठवण्यात आला आहे,’ असे ट्वीट तिने केले.
When someone claims to work on National Prime Prevention council & harasses women this way @MahaCyber1@MumbaiPolice pls take note. This message was sent to me on @facebook ! pic.twitter.com/KJ0OfUUqNy
— Suchitra Krishnamoorthi (@suchitrak) July 24, 2019
तिच्या या टिष्ट्वटची मुंबई पोलिसांनी लगेच दखल घेतली. यानंतर सुचितानेही लगेच मुंबई पोलिसांचे आभार मानलेत. ‘तुमच्या त्वरित प्रतिसादाबद्दल आभार. मी केवळ याकडे तुमचे लक्ष वेधू इच्छित होते. मी कुठल्याही संकटात नाही. पण मला असे मॅसेज पाठवले जाऊ शकतात तर सोशल मीडियावर अन्य तरूण मुलींची काय स्थिती असेल, याचा विचार करा,’ असे तिने लिहिले.
Thank you for prompt response. I wanted to bring it to ur notice thats all and i am not under any threat. If they can message me like this imagine the plight of young vulnerable girls on social media
— Suchitra Krishnamoorthi (@suchitrak) July 24, 2019
सुचित्राने ‘कभी हां कभी ना’ या चित्रपटातून बॉलिवूड डेब्यू केला होता. हा चित्रपट हिट ठरला होता. अभिनेत्री असण्यासोबतच गायिका अशीही तिची ओळख आहे. डोले डोले, दम तारा, जिंदगी हे तिचे म्युझिक अल्बम प्रचंड लोकप्रिय झालेत.