बॉलिवूडचे खिलाडी-किंग एकत्र, पंतप्रधानांच्या शपथविधी सोहळ्यावेळी शाहरुख-अक्षयची गळाभेट

By ऑनलाइन लोकमत | Published: June 10, 2024 11:34 AM2024-06-10T11:34:25+5:302024-06-10T11:38:51+5:30

पंतप्रधानांच्या शपथविधी सोहळ्यासाठी शाहरुख खान उद्योजक मुकेश अंबानी यांच्या बाजूला बसलेला दिसला.

Shahrukh Khan and Akshay Kumar hug each other at PM Narendra Modi oath ceremony | बॉलिवूडचे खिलाडी-किंग एकत्र, पंतप्रधानांच्या शपथविधी सोहळ्यावेळी शाहरुख-अक्षयची गळाभेट

बॉलिवूडचे खिलाडी-किंग एकत्र, पंतप्रधानांच्या शपथविधी सोहळ्यावेळी शाहरुख-अक्षयची गळाभेट

पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी काल राष्ट्रपती भवन येथे तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेतली. या शपथविधी सोहळ्याला अनेक दिग्गजांची उपस्थिती होती. विविध क्षेत्रातील मान्यवरांना या सोहळ्याचं निमंत्रण देण्यात आलं होतं. मनोरंजन क्षेत्रातूनही रजनीकांत, अक्षय कुमार, शाहरुख खान, अनुपम खेर यांनी हजेरी लावली. यावेळी शाहरुख (Shahrukh Khan) आणि अक्षय कुमारने (Akshay Kumar) एकमेकांची गळाभेट घेतली. या गळाभेटीचा फोटो चाहत्यांचं लक्ष वेधून घेत आहे.

पंतप्रधानांच्या शपथविधी सोहळ्यासाठी शाहरुख खान उद्योजक मुकेश अंबानी यांच्या बाजूला बसलेला दिसला. दरम्यान एएनआयने (ANI) ने अक्षय कुमार आणि शाहरुख खान यांच्या भेटीचा फोटो पोस्ट केला. यात दोघंही गळाभेट घेत आहेत. शाहरुखने ब्लॅक सूट परिधान केला आहे तर अक्षय कुमारने जांभळ्या रंगाचा शर्ट घातला आहे.  हा फोटो शपथविधी सोहळ्यातील हायलाईटच आहे.

शाहरुख-अक्षयचा फोटो पाहून चाहत्यांनी कमेंट्स करायला सुरुवात केली. 'बेस्ट hug', 'बॉलिवूडचा खिलाडी आणि किंग एकत्र' असं म्हणत दोघांचे चाहते खूश झाले. या शपथग्रहण सोहळ्याला इतरही काही स्टार्स हजर होते. '12th फेल' फेम विक्रांत मेस्सी, राजकुमार हिरानीही हजर होते.

नरेंद्र मोदी यांनी काल हॅट्रिक करत पंतप्रधानपदाची शपथ घेतली. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी त्यांना शपथ दिली. सोबतच ७२ मंत्र्यांनीही शपथ घेतली. अशा प्रकारे देशात NDA सरकार पुन्हा आलं आहे.

Web Title: Shahrukh Khan and Akshay Kumar hug each other at PM Narendra Modi oath ceremony

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.