Pathaan Movie : "आधी हनीमूनला जाऊ की पठाण पाहू", चाहत्याच्या प्रश्नावर शाहरुख म्हणतो, 'बेटा...'
By ऑनलाइन लोकमत | Published: January 24, 2023 02:08 PM2023-01-24T14:08:14+5:302023-01-24T14:57:08+5:30
चाहत्याने हनीमून की सिनेमा असा गोंधळात टाकणारा प्रश्न शाहरुखला विचारला आहे. शाहरुखनेही त्यावर भन्नाट उत्तर दिलं आहे.
Pathaan Movie : बॉलिवुडचा किंग शाहरुख खानचा (Shahrukh Khan) बहुप्रतिक्षित चित्रपट 'पठाण' उद्या (25 january) रोजी रिलीज होत आहे. ४ वर्षांनी शाहरुखला मोठ्या पडद्यावर पाहण्याची चाहत्यांची उत्सुकता प्रचंड ताणली आहे. शाहरुख खानही खूप उत्सुक दिसतोय. 'पठाण' साठी आता फक्त एक दिवस बाकी असताना शाहरुखने ट्विटरवर चाहत्यांच्या प्रश्नांना उत्तरं दिली आहेत. यात एका चाहत्याने हनीमून की सिनेमा असा गोंधळात टाकणारा प्रश्न शाहरुखला विचारला आहे. शाहरुखनेही त्यावर भन्नाट उत्तर दिलं आहे.
शाहरुख खान अनेकदा ask srk या ट्विटरच्या सेशनमधून चाहत्यांशी गप्पा मारतो. आता पठाणच्या पार्शभूमीवर तर त्याने अनेकदा हे ask srk सेशन केले आहे. आजही त्याने चाहत्याचे मनोरंजन केले. एका चाहत्याचा प्रश्न तर इतका मजेदार आहे की हसून हसून पुरेवाट होईल. या चाहत्याने ट्वीट केले,'सर मागच्या आठवड्यातच लग्न झालं. आता आधी हनिमून ला जाऊ की पठाण बघायला जाऊ?'
Sir, last week shaadi huyi meri,
— Shahzaad Khan ( Pathaan) (@SRKZzZPathaan) January 24, 2023
Pahle honeymoon jaau ya #Pathaan Dekhu???#AskSRK@iamsrk
चाहत्याच्या या प्रश्नावर शाहरुखने त्याच्या स्टाईलमध्ये रिप्लाय केला आहे. शाहरुखने रिप्लायमध्ये ट्वीट केले, 'बेटा एक आठवडा झाला आणि अजून तू हनीमूनला नाही गेला ! आता बायकोसोबत आधी पठाण बघ आणि हनीमूनला नंतर जा.'
Beta ek hafta ho gaya abhi tak honeymoon nahi kiya!!! Now go see #Pathaan with wife and do honeymoon later… https://t.co/yqmvzQX5Ai
— Shah Rukh Khan (@iamsrk) January 24, 2023
PM च्या राज्यात पठाणला विरोध नाही, बजरंग दलाचे स्पष्टीकरण; म्हणाले, 'सिनेमा बघायचा की नाही...'
'पठाण' सिनेमा प्रदर्शित होण्याच्या आधीच इतका लोकप्रिय झाला आहे की प्रत्येक शहरात प्रिबुकिंग फुल झाले आहेत. दिल्ली, हरियाणा मध्ये तर तिकीटांची किंमत दोन हजार रुपये ते २४०० रुपयांपर्यंत पोहोचले आहेत. आता सिनेमा किती बिझिनेस करतो याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. पठाण मध्ये 'शाहरुख खान', 'दीपिका पदुकोण', 'जॉन अब्राहम' यांची महत्वाची भूमिका आहे.