कृपया मलाही 'ऑस्कर' ला हात लावू द्या, शाहरुख खानच्या ट्वीटवर उत्तर देत रामचरणने जिंकले भारतीयांचे मन
By ऑनलाइन लोकमत | Published: January 11, 2023 04:34 PM2023-01-11T16:34:50+5:302023-01-11T16:35:36+5:30
शाहरुख खानने साऊथ सुपरस्टार रामचरणकडे ऑस्करला हात लावू द्याल अशी मागणी केली आहे. यावर रामचरणने दिलेलं उत्तर कौतुकास्पद आहे.
एसएस राजामौली यांच्या RRR सिनेमाने इतिहास रचला आहे. या सिनेमातील 'नाटू नाटू' गाण्याला गोल्डन ग्लोब अवॉर्डमध्ये बेस्ट ओरिजिनल सॉंगचा अवॉर्ड मिळाला. जशी याची घोषणा झाली तिथे असलेल्या राजामौली, रामचरण आणि जूनियर एनटीआर यांनी एकच जल्लोष केला. या गाण्याच्या यशाचं श्रेय जेवढं जूनियर एनटीआर (Jr NTR), रामचरण (Ramcharan) आणि राजामौली (SS Rajamauli) यांना जातं, ते तेवढंच कोरिओग्राफर प्रेम रक्षित (Prem Rakshit) यालाही जातं. साऊथ इंडस्ट्री ते बॉलिवूडपर्यंत जल्लोषाचे वातावरण असून सर्व सेलिब्रिटी चित्रपटाच्या संपूर्ण टीमचे अभिनंदन करत आहेत. अभिनेता शाहरुख खाननेही ट्विट करत एस एस राजामौली आणि आरआरआर टीमचे कौतुक केले आहे.
तर दुसरीकडे शाहरुख खानच्या पठाण (Pathaan) सिनेमाचे ट्रेलर प्रदर्शित झाले आहे. या ट्रेलरला साऊथमधूनही प्रतिसाद मिळत आहे. सुपरस्टार रामचरण याने शाहरुखच्या पठाणचे कौतुक केले आहे. रामचरण ट्विट करत म्हणाला, 'पठाण च्या संपूर्ण टीम ला शुभेच्छा. शाहरुख सर तुम्हाला कधीही न बघितलेल्या अॅक्शन अवतारात पाहण्यासाठी मी उत्सुक आहे.'
Wishing the whole team of #Pathaan all the very best!@iamsrk Sir looking fwd to seeing you in action sequences like never before! #PathaanTrailerhttps://t.co/63G1CC4R20@deepikapadukone | @TheJohnAbraham | #SiddharthAnand | @yrfpic.twitter.com/MTQBfYUfjg
— Ram Charan (@AlwaysRamCharan) January 10, 2023
रामचरणच्या याच ट्विटवर शाहरुखने प्रतिक्रिया दिली आहे. त्याने लिहिले, 'मेगा पॉवर स्टार तुझे खूप आभार. जेव्हा तुमची आरआरआर टीम ऑस्कर भारतात घेऊन येईल तेव्हा कृपया मला हात लावू द्याल. खूप प्रेम. '
Thank u so much my Mega Power Star @alwaysramcharan. When ur RRR team brings Oscar to India, please let me touch it!!
— Shah Rukh Khan (@iamsrk) January 10, 2023
(Mee RRR team Oscar ni intiki tecchinappudu okkasaari nannu daanini touch cheyyanivvandi! )
Love you.
यावर रामचरणने प्रतिक्रिया देत चाहत्यांचे मन जिंकले आहे. तो म्हणाला,'नक्कीच सर, तो पुरस्कार भारतीय सिनेमाचाच असेल.' रामचरण ने हे उत्तर देत बॉलिवूड, साऊथ काही वेगळं नाही भारतीय सिनेमा महत्वाचा हे त्याने दाखवून दिलं आहे.
Of course @iamsrk Sir!
— Ram Charan (@AlwaysRamCharan) January 10, 2023
The award belongs to Indian Cinema❤️ https://t.co/fmiqlLodq3
Pathaan Movie : 'शाहरुखसाठी तर इतर मुलांना सोडून देईन'; किंग खानवर मॉडेल झाली फिदा
'पठाण' हा सिनेमा सिद्धार्थ आनंद यांनी दिग्दर्शित केला आहे. चित्रपटात जॉन अब्राहम हाही मुख्य भूमिकेत आहे. नुकताच या सिनेमाचा ट्रेलर प्रदर्शित झाला. त्याला जबरदस्त रिस्पॉन्स मिळाला आहे. या चित्रपटाद्वारे शाहरूखने तब्बल चार वर्षानंतर वापसी केली आहे. येत्या
२५ जानेवारीला हा चित्रपट प्रदर्शित होत आहे.