Shahrukh khan birthday : शाहरुख खानला 'या' कारणावरून झाली होती अटक
By ऑनलाइन लोकमत | Published: November 2, 2018 08:30 AM2018-11-02T08:30:00+5:302018-11-02T10:36:43+5:30
शाहरुख खान हा अनेक वर्षं बॉलिवूडमध्ये आहे. बॉलिवूडचा तो किंग मानला जातो. कॉन्ट्रोव्हर्सींपासून दूर राहाणेच तो नेहमी पसंत करतो. पण तुम्हाला माहीत आहे का, १९९२ साली शाहरुख एका चांगल्याच वादात अडकला होता.
अभिनेता शाहरुख खानचा आज वाढदिवस असून त्याचा जन्म २ नोव्हेंबर १९६५ ला दिल्लीमध्ये झाला. त्याने दिल दरीया, फौजी, सकर्स यांसारख्या अनेक मालिकांमध्ये काम केले. त्याच्या फौजी या मालिकेला प्रेक्षकांची चांगलीच पसंती मिळाली. यामुळेच त्याला हेमा मालिनी यांनी दिल आशना है या चित्रपटात काम करण्याची संधी दिली. त्यानंतर त्याला दिवाना या चित्रपटाची ऑफर आली. त्याने दिल आशना है या चित्रपटाद्वारे त्याच्या बॉलिवूडमधील कारकिर्दीला सुरुवात केली असली तरी दिवाना हा चित्रपट आधी प्रदर्शित झाला असल्याने दिवाना त्याचा पहिला चित्रपट ठरला.
शाहरुख खान हा अनेक वर्षं बॉलिवूडमध्ये आहे. बॉलिवूडचा तो किंग मानला जातो. कॉन्ट्रोव्हर्सींपासून दूर राहाणेच तो नेहमी पसंत करतो. पण तुम्हाला माहीत आहे का, १९९२ साली शाहरुख एका चांगल्याच वादात अडकला होता. माया मेमसाब या चित्रपटाबाबतीत एक बातमी एका मासिकाने छापली होती. या बातमीवरून शाहरुख प्रचंड संतापला होता आणि त्याने त्या मासिकातील पत्रकाराला मारण्याची धमकी देखील दिली होती.
सिनेब्लिट्ज मासिकाने एक बातमी दिली होती आणि त्यात म्हटले होते की, मेमसाब या चित्रपटातील इंटिमेट दृश्य चांगल्याप्रकारे चित्रीत व्हावे यासाठी या चित्रपटाचे दिग्दर्शक केतन मेहता यांनी अभिनेत्री दीपा साहीसोबत शाहरुखला एक रात्र हॉटेलमध्ये घालवायला सांगितली होती. दीपा ही केतन यांचीच पत्नी आहे. दीपा आणि शाहरुख हे चित्रपटातील इंटिमेट दृश्यासाठी कर्म्फटेबल असावेत म्हणून त्यांनी देखील दिग्दर्शकाची ही मागणी पूर्ण केली आणि त्यानंतर दुसऱ्या दिवशी केवळ दिग्दर्शक आणि सिनेमेटॉग्राफर यांच्या उपस्थितीत हे चित्रीकरण पार पडले असे त्यांनी त्यांच्या बातमीत लिहिले होते. ही बातमी वाचून शाहरुख चांगलाच चिडला होता आणि त्याने या मासिकातील किथ डी-कोस्टा यांच्यावर हल्ला केला होता. हा लेख किथ यांनीच लिहिला असल्याचे शाहरुखला वाटत होते. त्यामुळे किथला फोन करून शाहरुख शिवीगाळ करत असत. यामुळे किथ प्रचंड घाबरले होते आणि त्यामळे मासिकाच्या संपादकाच्या सल्ल्याने त्यांनी शाहरुख विरोधात पोलिसांकडे तक्रार नोंदवली होती. पण तरीही शाहरुख त्यांना धमकावत होता. त्यामुळे त्यांनी पोलिसांकडे सुरक्षेची मागणी केली होती. त्यामुळे शाहरुखला अटक करून वांद्रा पोलिस स्टेशनमध्ये आणण्यात आले होते. शाहरुख त्यावेळी मोठा स्टार झालेला होता. त्यामुळे शाहरुखला पोलिसांनी त्रास न देता उलट त्याच्याकडून ते ऑटोग्राफ घेत होते. एवढेच नव्हे तर तिथून किथला फोन करून शाहरुखने पुन्हा एकदा धमकी दिली होती. शाहरुखला पोलिस स्टेशनमध्ये आणल्यावर अभिनेता चंकी पांडेने त्याच्यासाठी जामीन दिला होता. हे प्रकरण शांत झाल्यानंतर काही वर्षांनी शाहरुखला याच मासिकाच्या एका पत्रकाराकडून कळले होते की, ती बातमी किथ यांनी लिहिली नव्हती. त्यामुळे शाहरुखने किथ यांची माफी मागितली होती. तसेच या मासिकासाठी एक खास फोटोशूट देखील केले होते. या सगळ्या घटनेविषयी लेखिका अनुपमा चोप्रा यांनी किंग ऑफ बॉलिवूडः शाहरुख खान अँड द सेडक्टिव्ह वर्ल्ड ऑफ इंडियन सिनेमा या पुस्तकात लिहिले आहे.