शाहरूख खान प्रकरण आता अधिवेशनातही गाजणार, आमदार जयंत पाटील यांचा संताप कायम!

By ऑनलाइन लोकमत | Published: November 11, 2017 09:06 AM2017-11-11T09:06:34+5:302017-11-11T14:41:25+5:30

‘तू अलिबाग विकत घेतला नाहीस, माझ्या परवानगीशिवाय तू अलिबागला पायही ठेवू शकत नाहीस, हा कसला सुपरस्टार अशा शब्दांमध्ये बॉलिवूडचा ...

Shahrukh Khan case will be held in the session, MLA Jayant Patil's resentment! | शाहरूख खान प्रकरण आता अधिवेशनातही गाजणार, आमदार जयंत पाटील यांचा संताप कायम!

शाहरूख खान प्रकरण आता अधिवेशनातही गाजणार, आमदार जयंत पाटील यांचा संताप कायम!

googlenewsNext
ू अलिबाग विकत घेतला नाहीस, माझ्या परवानगीशिवाय तू अलिबागला पायही ठेवू शकत नाहीस, हा कसला सुपरस्टार अशा शब्दांमध्ये बॉलिवूडचा किंग शाहरूख खानला झापणारे शेतकरी कामगार पक्षाचे आमदार जयंत पाटील आता हे प्रकरण आगामी अधिवेशनातही गाजविणार आहेत. त्यामुळे जयंत पाटील यांचा शाहरूखवरील संताप अजूनही कमी झाला नाही असे म्हटले तर चुकीचे ठरू नये. अलिबागला वाढदिवस साजरा करणाºया शाहरूखला मुंबईत परतताना समुद्र किनाºयावर आमदार जयंत पाटील यांच्या संतापाचा सामना करावा लागला होता. कारण शाहरूखच्या बोटीमुळे जयंत पाटील यांना त्याच्या चाहत्यांमधून वाट काढत बराच वेळ ताटकळत बसावे लागले होते. त्यामुळे त्यांच्या संतापाचा चांगलाच पारा चढला होता. त्यांनी थेट शाहरूखच्या बोटीत जाऊन त्याला खरी-खोटी सुनावली होती.  

गेल्या ३ नोव्हेंबर रोजी शाहरूखने त्याच्या अलिबागमधील फार्म हाउसवर त्याचा वाढदिवस साजरा केला होता. त्याच्या वाढदिवसासाठी बॉलिवूडमधील अनेक सेलिब्रिटी उपस्थित होते. वाढदिवस सेलिब्रेट केल्यानंतर शाहरूख सुपर बोटने मुंबईत परतत होता. त्याची बोट गेट वे आॅफ इंडियाजवळील जेट्टीवर पोहोचली. ही बाब जेव्हा त्याच्या चाहत्यांना कळाली तेव्हा हजारोंच्या संख्येने त्यांनी त्याठिकाणी गर्दी केली होती. त्यातच शाहरूख बराच वेळ बोटीमध्येच बसून राहिल्याने गर्दी वाढतच गेली. यादरम्यान पोलिसांनी इतर प्रवाशांनाही शाहरूखमुळे रोखून ठेवले. या प्रवाशांमध्ये आमदार जयंत पाटील यांचा समावेश होता. 

READ ALSO : समुद्र किनाºयावरच आमदार जयंत पाटील शाहरूख खानशी भिडले; म्हटले, ‘हा कसला सुपरस्टार’

बराच वेळ झाल्यानंतरही पोलीस जाऊ देत नसल्याचे लक्षात आल्यानंतर जयंत पाटील यांचा प्रचंड संताप झाला. त्यांनी संबंध चाहत्यांसमोर शाहरूखच्या बोटीवर जात त्याला असे काही सुनावले की, सर्वच दंग राहिले. ‘तू अलिबाग विकत घेतला नाहीस’ अशा शब्दात त्यांनी शाहरूखला फटकारले. हा सर्व प्रकार गर्दीतील काही तरुणांनी मोबाइलमध्ये शूट केला. पुढे हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर हा संपूर्ण प्रकार समोर आला. 

दरम्यान, याबाबत जेव्हा आमदार जयंत पाटील यांना विचारण्यात आले तेव्हा ते म्हणाले की, ‘सुटीचे दिवस असल्याने अलिबागला बोटीने जाणाºया प्रवाशांची संख्या भरपूर असते. मात्र केवळ शाहरूखमुळे जेट्टीवरील वाहतूक थांबवावी लागली. यामुळे असंख्य प्रवाशांचे हाल झाले. शाहरूख बोटीत बसून सिगारेट ओढत होता. त्याच्या चाहत्यांना फ्लार्इंग किस देत होता. परंतु त्याच्या या थिल्लरपणामुळे प्रवाशांना ताटकळत बसावे लागले. विशेष म्हणजे यासर्व प्रकारात पोलीस शाहरूखची बाजू घेत होते. हल्ली मंत्र्यांनाही एवढी सुविधा दिली जात नाही, मग शाहरूखसाठी पोलिसांचा एवढा ताफा कशासाठी? प्रवाशांना झालेल्या त्रासामुळे मी हा मुद्दा आगामी अधिवेशनात उपस्थित करणार’ असेही पाटील यांनी स्पष्ट केले. 

दरम्यान, जेव्हा जयंत पाटील शाहरूखला झापत होते, तेव्हा शाहरूख शांतपणे बसून होता. त्याने जयंत पाटील यांच्यासमोर एक शब्दही काढला नाही. जेव्हा ते घटनास्थळावरून निघून गेले, तेव्हा शाहरूख बाहेर आला आणि चाहत्यांना त्याने अभिवादन केले. आता हे प्रकरण समोर आले असून, शाहरूख यावर प्रतिक्रिया देणार की त्या दिवसाप्रमाणे शांत राहणार हे बघणे औत्सुक्याचे ठरेल. 

Web Title: Shahrukh Khan case will be held in the session, MLA Jayant Patil's resentment!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.