शाहरूख खानने बदलले इंग्लंडमधील तरूणाचे आयुष्य!

By ऑनलाइन लोकमत | Published: March 10, 2017 11:50 AM2017-03-10T11:50:06+5:302017-03-10T17:20:06+5:30

शाहरूख खान आपल्या अभिनयामुळे प्रसिद्ध आहेच, त्याशिवाय त्याचा जीवनाकडे पाहण्याचा दृष्टीकोनही अनेकांना भावतो. त्याचे व्यक्तीमत्त्व, त्याचा स्वभाव, कलाकार म्हणून ...

Shahrukh Khan changed the life of a youth in England | शाहरूख खानने बदलले इंग्लंडमधील तरूणाचे आयुष्य!

शाहरूख खानने बदलले इंग्लंडमधील तरूणाचे आयुष्य!

googlenewsNext
हरूख खान आपल्या अभिनयामुळे प्रसिद्ध आहेच, त्याशिवाय त्याचा जीवनाकडे पाहण्याचा दृष्टीकोनही अनेकांना भावतो. त्याचे व्यक्तीमत्त्व, त्याचा स्वभाव, कलाकार म्हणून तो ग्रेटच आहे. एक विनम्र व्यक्ती म्हणून शाहरूखचा नेहमीच गौरव होतो. त्याला पाहून अनेकांचे आयुष्य बदलले आहे. आता हेच पाहा ना, काही वर्षापूर्वी त्याला मलेशिया येथे भेटलेल्या इंग्लंडमधील नागरिकाने ट्विटरवर शाहरूखमुळे आपले आयुष्य कसे बदलले आहे, हे सांगितलंय. शाहरूखचाही मोठेपणा असा की, त्याने त्याला अजूनही लंडनमध्येच राहतो का? असे विचारून पुढच्या वेळी त्याला नक्कीच भेटेन असे सांगितले.
 


 


 


ब्रिटनमध्ये राहणारे शाहीद कमाल हे गेम डेव्हलपर आहेत. त्यांनी अनेक ट्विट करून आपल्या आयुष्याची कहाणी सांगितलीय. सहा वर्षापूर्वी शाहरूख खानने डॉन २ चे शूटिंग सुरू असताना लंकावीमध्ये शाहीद यांना रात्रभोजन दिले. त्याशिवाय त्याने सोबत असलेली क्युबन सिगारेटही दिली. त्यावेळी शाहीद फार यशस्वी झालेले नव्हते. शाहरूखने चांगल्या व्यक्तीदेखील कशा जिंकू शकतात हे सांगितले. शाहरूखला पाहून कोणताही यशस्वी आणि सर्वांपेक्षा वेगळी व्यक्ती किती विनम्र आणि सभ्य असू शकते, हे मला पटले. चांगल्या व्यक्ती प्रत्येक वेळा पराभूत होईलच, असे नाही. 

  
माझ्यासारख्या सामान्य माणसाला शाहरूखने इतका मान दिला, यामुळे मी भावूक झालो. एकदा तर स्वत: शाहरुखने त्याच्यासाठी ड्रिंक्स आणले. सेवेची शक्ती काय असते, हे त्याने दाखवून दिले. आपल्या व्यवसायात या गोष्टी विसरत नाहीत, असे शाहीद यांनी सांगितले.
या संपूर्ण ट्विटबाबत शाहरूखने दाखल घेतली आणि पुढच्या वेळी लंडनला आल्यानंतर भेटीचे आश्वासनही दिले.



 

Web Title: Shahrukh Khan changed the life of a youth in England

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.