ठरलं तर! या सिनेमातून होणार शाहरूखची लाडकी लेक सुहानाचा डेब्यू!!
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 18, 2021 14:01 IST2021-08-18T14:00:53+5:302021-08-18T14:01:11+5:30
संजय लीला भन्साळी, करण जोहर नाही तर शाहरूखची ही मैत्रिण करणार लॉन्च!!

ठरलं तर! या सिनेमातून होणार शाहरूखची लाडकी लेक सुहानाचा डेब्यू!!
शाहरूख खानची (Shahrukh Khan) लाडकी लेक सुहाना खान (Suhana Khan) इंडस्ट्रीतील सर्वाधिक लोकप्रिय स्टारकिड्सपैकी एक आहे. सुहानाचे ग्लॅमरस फोटो सोशल मीडियावर चर्चेत असतात. अद्याप सुहानाने बॉलिवूडमध्ये डेब्यू केलेला नाही. पण कदाचित लवकरच तिच्या बॉलिवूड डेब्यूची प्रतीक्षा संपणार आहे. होय, ते सुद्धा झोया अख्तरच्या सिनेमातून.
अगदी सुरूवातीला संजय लीला भन्साळींच्या सिनेमातून सुहानाचा डेब्यू होणार, अशी चर्चा होती. पण ही चर्चा हवेत विरली. यानंतर शाहरूखने लेकीच्या डेब्यूचा जिम्मा करण जोहरच्या खांद्यावर टाकल्याच्या चर्चा झाल्या. करणच्या सिनेमातून सुहानाचा ग्रँड डेब्यू होणार, असे म्हटले गेले. सुहानाचे चाहते प्रतीक्षा करत राहिले पण पुढे काहीही हालचाली दिसल्या नाहीत. पण आता मात्र चाहत्यांची प्रतीक्षा संपणार आहे.
पिंकविलाने दिलेल्या वृत्तानुसार, झोया अख्तर सुहाना खानला लॉन्च करणार असल्याचे कळतेय. झोयाने आपल्या आगामी चित्रपटासाठी सुहानाची निवड केल्याचे या वृत्तात म्हटले आहे.
इंटरनॅशनल कॉमिक बुक आर्चीवर झोया चित्रपट बनवणार आहे. याच चित्रपटासाठी सुहाना झोयाची पहिली पसंत असल्याचे कळते. या सिनेमात काही मित्रांची कथा दाखवली जाईल.
सिनेमासाठी आणखीही काही फ्रेश चेह-यांच्या झोयाला शोध आहे. हा शोध सुरू आहे. पण सुहाना मात्र या सिनेमासाठी कन्फर्म मानली जातेय. सुहाना व शाहरूखला स्क्रिप्ट आवडलीच तर पेपर वर्क पूर्ण करून सिनेमाचे शूटींग सुरू होईल अशी अपेक्षा आहे.
विशेष म्हणजे, हा सिनेमा चित्रपटगृहांमध्ये नाही तर नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज होणार आहे.
सुहाना खानबद्दल सांगायचे तर ती सोशल मीडियावर प्रचंड सक्रीय असते. तिच्या प्रत्येक पोस्टवर चाहत्यांचे लक्ष लागलेले असते. तसेच तिच्या प्रत्येक फोटोंवर लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होत असतो. सुहाना सध्या न्यूयॉर्कमध्ये शिक्षण घेत आहे. ती सतत आपल्या मित्रांसोबत फोटो शेयर करताना दिसून येते. शाहरुखनंतर आता सुहानाला चित्रपटांमध्ये पाहण्यासाठी चाहते उत्सुक आहेत.