का दिला शाहरुखने करण जोहरच्या फिल्मला नकार?
By ऑनलाइन लोकमत | Published: December 17, 2016 12:14 PM2016-12-17T12:14:43+5:302016-12-17T12:14:43+5:30
बॉलीवूडचे असली ‘जय-वीरू’ म्हणजे शाहरुख खान आणि करण जोहर. मागच्या दोन दशकांपासून चालत आलेली त्यांची मैत्री अतूट मानली जाते. ...
ब लीवूडचे असली ‘जय-वीरू’ म्हणजे शाहरुख खान आणि करण जोहर. मागच्या दोन दशकांपासून चालत आलेली त्यांची मैत्री अतूट मानली जाते. किंग खानशिवाय तो चित्रपटाचा विचार करू शकत नाही असे बोलले जाई. मात्र मध्यंतरी त्यांच्या नात्यामध्ये दुरावा आला.
सगळे काही ठीक आहे असे म्हणत दोघांनी एकमेकांची पाठराखणही केली. करण दिग्दर्शित ‘ऐ दिल है मुश्किल’मध्ये शाहरुखने छोटीशी भूमिका केल्यामुळे दोघांमध्ये ‘आॅल इज वेल’ वाटत असताना एसआरकेने करणच्या पुढील चित्रपटाचा प्रस्ताव नाकारला आहे.
शाहरुखच्या नकारामुळे करण नाराज झाल्याचे सांगण्यात येतेय. खूप प्रयत्न करूनही तो सुपरस्टारला चित्रपटात काम करण्यासाठी त्याची मनधरणी करू शकला नाही. अखेर नाइलाजाने त्याने हृतिकचे दरवाजे ठोठावले.
सुत्रांनुसार, ‘शाहरुखला या चित्रपटाची पटकथा फारशी रुचली नाही. निर्मात्यांनी त्याला पटवण्याचा खूप प्रयत्न केला पण त्यांच्यामध्ये सहमती होऊ शकली नाही. शेवटचा पर्याय म्हणून निराश झालेल्या करणने हृतिकला विचारणा केली. हृतिकने जास्त वेळ न घेता प्रस्तावाला होकार दिला आणि करणचा जीव भांड्यात पडला.’
‘रईस’ वि. ‘काबील’ : हृतिक - शाहरुख
या प्रोजेक्टची खासियत म्हणजे दीपिका पदुकोन प्रमुख अभिनेत्री असणार आहे. म्हणजे सर्व काही जुळून आले असता हृतिक-दीपिका ही जोडी प्रथमच एकत्र येईल. या संपूर्ण घटनाक्रमाचे इंडस्ट्रीमध्ये अनेक अर्थ काढले जात आहेत.
शाहरुखने नकार दिला असता करणच्या मदतीला हृतिक धावून येणे म्हणजे त्यांच्या मैत्रीला लागलेली उतरती कळा मानावी का? ‘रईस’ वि. ‘काबील’ स्पर्धेमुळे शाहरुख-हृतिकसंबंध ताणले गेलेले आहेत. करणच्या निमित्ताने हृतिक शाहरुखच्या गटात प्रवेश करून त्याला शह देण्याचा प्रयत्न तर करीत नाही ना? असे अनेक प्रश्न चर्चिले जाऊ लागले आहेत.