Eid 2023: शाहरुख खानने चाहत्यांना दिली ईदी, मन्नतमधून बाहेर येऊन किंगखानने दिल्या शुभेच्छा

By ऑनलाइन लोकमत | Published: April 22, 2023 05:13 PM2023-04-22T17:13:44+5:302023-04-22T17:16:51+5:30

बॉलिवूडचा सुपरस्टार शाहरुख खानचा एक लेटेस्ट व्हिडिओ समोर आला आहे. या व्हिडिओमध्ये शाहरुख खान मन्नतच्या घराबाहेर उपस्थित असलेल्या चाहत्यांना ईदच्या शुभेच्छा देत आहे.

Shahrukh khan eid wishes to fans outside mannat watch video | Eid 2023: शाहरुख खानने चाहत्यांना दिली ईदी, मन्नतमधून बाहेर येऊन किंगखानने दिल्या शुभेच्छा

Eid 2023: शाहरुख खानने चाहत्यांना दिली ईदी, मन्नतमधून बाहेर येऊन किंगखानने दिल्या शुभेच्छा

googlenewsNext

देशभरात ईद साजरी होत आहे. सर्वजण एकमेकांचे अभिनंदन करत आहेत. बॉलीवूडमधील कलाकारही चाहत्यांना ईदच्या शुभेच्छा दिल्या आहेत. बॉलिवूडचा किंगखान मग कसा मागे राहिल यात, शाहरुख खानने मन्नतच्या घराबाहेर उपस्थित हजारो चाहत्यांना ईदच्या शुभेच्छा दिल्या आहेत. शाहरुख खानचा एक लेटेस्ट व्हिडिओ सोशल मीडियावर समोर आला आहे.

‘पठाण’ चित्रपटाच्या यशानंतर शाहरुख खान नक्कीच ईद द्यायला येईल या आशेवर त्याच्या घराबाहेर चाहते जमले होते. शाहरुख खानचा एक लेटेस्ट व्हिडिओ समोर आला आहे. ज्यामध्ये शाहरुख मन्नतच्या घराबाहेर उपस्थित असलेल्या चाहत्यांना ईदच्या शुभेच्छा देताना दिसत आहे. हा व्हिडिओ फोटोग्राफर मानव मंगलानी यांनी त्यांच्या अधिकृत इंस्टाग्राम हँडलवर शेअर केला आहे.

या व्हिडिओमध्ये तुम्ही स्पष्टपणे पाहू शकता की, ईदच्या निमित्ताने शाहरुखच्या घराबाहेर हजारो चाहते जमले होते. ईदच्या दिवशी त्यांच्या आवडत्या स्टारची एक झलक पाहण्यासाठी चाहते मन्नतच्या बाहेर प्रतीक्षा करत होते. मात्र शाहरुख खाननेही आपल्या चाहत्यांची निराशा केली नाही आणि मन्नतमधून बाहेर पडून आपल्या चाहत्यांची ईद खास बनवली आहे.

'पठाण' चित्रपटाच्या यशानंतर आता सर्वजण शाहरुख खानच्या आगामी 'जवान' या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहेत. किंग खानचा जवान हा चित्रपट 2 जून 2023 रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात शाहरुख खानसोबत साऊथची सुपरस्टार नयनतारा मुख्य भूमिकेत दिसणार आहे.
 

Web Title: Shahrukh khan eid wishes to fans outside mannat watch video

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.