ASK SRK : शाहरुख, 'अब रिटायर हो जाओ'; युझरच्या कमेंटवर शाहरुख खान म्हणतो, बेटा...

By ऑनलाइन लोकमत | Published: January 4, 2023 04:49 PM2023-01-04T16:49:38+5:302023-01-04T16:50:40+5:30

शाहरुखच्या ask srk मध्ये आलिया भटही सामील झाली. शाहरुखला २५ जानेवारीपासून पठाण याच नावाने बोलवेन असं ट्विट तिने केलं आहे.

shahrukh-khan-gave-amazing-reply-to-user-who-said-pathan-already-disaster-get-retirement | ASK SRK : शाहरुख, 'अब रिटायर हो जाओ'; युझरच्या कमेंटवर शाहरुख खान म्हणतो, बेटा...

ASK SRK : शाहरुख, 'अब रिटायर हो जाओ'; युझरच्या कमेंटवर शाहरुख खान म्हणतो, बेटा...

googlenewsNext

ASK SRK : शाहरुख खानला (Shahrukh Khan) ट्विटरवर येऊन १३ वर्ष पूर्ण झाले. यानिमित्त शाहरुखने त्याच्या चाहत्यांचे त्याच्या फॅन्स क्लबचे आभार मानले आहेत. दरम्यान नेहमीप्रमाणे शाहरुख खानने ask srk या सेशनमधून चाहत्यांच्या प्रश्नांना उत्तरं दिली. 

शाहरुख ट्विटरवर  #AskSRK हे सेशन घेत असतो. यात तो चाहत्यांना रिप्लाय करत असतो. त्यामुळे चाहतेही अनेक भन्नाट प्रश्न विचारतात आणि शाहरुख त्यांना जशास तसे उत्तर देतो. नुकतेच शाहरुखने एका ट्रोलरला सडेतोड उत्तर दिले आहे. ask srk मध्ये एका युझरने कमेंट केली, ' पठाण already disaster, आप रिटायर हो जाओ.' यावर शाहरुख म्हणतो, ' बेटा बडो से ऐसे बात नही करते' .

याशिवाय एकाने कमेंट केली,' सर तुमच्याकडून रिप्लाय याना म्हणून मी २ लग्न केले, दोघी प्रेग्नंट झाल्या आता तरी रिप्लाय द्या '
यावर शाहरुख म्हणतो, 'अब तो बेटा बिवियॉं ही रिप्लाय देंगी तुझे.'

शाहरुखच्या या सेशनमध्ये आलिया भटही सामील झाली. २५ जानेवारीपासून मी पठाण याच नावाने संबोधणार असे ट्विट तिने शाहरुख खानला केले. यावर शाहरुखनेही आलियाला क्युट रिप्लाय दिला. मी तुला अम्मा भट कपूर बोलवेन असा रिप्लाय दिला. 

'पठाण' हा सिनेमा २५ जानेवारी रोजी रिलीज होत आहे. मात्र रिलीजआधीच पिक्चर बॉयकॉट करण्याची मागणी होऊ लागली आहे. पठाण हे नाव, बेशरम रंग गाण्यातली भगवी बिकीनी यामुळे पठाण रिलीजच होऊ देणार नाही अशी धमकीच अनेक संघटनांनी दिली आहे. आता मात्र १० जानेवारी रोजी 'पठाण'चा ट्रेलर रिलीज होतोय.  

Web Title: shahrukh-khan-gave-amazing-reply-to-user-who-said-pathan-already-disaster-get-retirement

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.