शाहरुख खानने आजपर्यंत केली नाही 'ही' गोष्ट, वाचा सविस्तर

By ऑनलाइन लोकमत | Published: January 1, 2019 06:30 PM2019-01-01T18:30:00+5:302019-01-01T18:30:00+5:30

बॉलिवूडचा बादशाह शाहरुख खान आणि गौरी खान यांची लव्ह स्टोरी बॉलिवूडमधील सगळ्यात इंट्रेस्टिंग लव्ह स्टोरी आहे.

Shahrukh Khan has not done so far, 'this' thing, read detailed | शाहरुख खानने आजपर्यंत केली नाही 'ही' गोष्ट, वाचा सविस्तर

शाहरुख खानने आजपर्यंत केली नाही 'ही' गोष्ट, वाचा सविस्तर

googlenewsNext

कधी आपल्या सिनेमांमुळे तर कधी स्टाइल स्टेटमेंटमुळे. तर कधी आणखीन कोणत्या गोष्टींमुळे सेलिब्रेटीमंडळी नेहमीच चर्चेत असतात. बॉलिवूडचा बादशाह शाहरुख खान आणि गौरी खान यांची लव्ह स्टोरी बॉलिवूडमधील सगळ्यात इंट्रेस्टिंग लव्ह स्टोरी आहे.   बॉलिवूडचा बादशाहाचे गौरी खानवर असलेले प्रमे हे तर जगजाहीर आहेच. त्याच्या लव्हस्टोरी प्रमाणे आपलीही लव्हस्टोरी असावी अशी प्रत्येकाची इच्छा असते. आतापर्यंत शाहरूख आणि गौरीविषयी त्यांच्या चाहत्यांना प्रत्येक गोष्ट माहिती झाली आहे. मात्र एक गोष्ट आहे जी अजूनही कोणालाच माहीत नाही. ती म्हणजे नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत शाहरूखने पहिल्यांदाच ही गोष्ट उघडणे बोलुन दाखवली. वैयक्तिक आयुष्याविषयी बोलताना शाहरुख म्हणाला, "आमच्या लग्नाला 30 वर्षांहून अधिकचा काळ लोटला आहे. पण एवढ्या वर्षांत मी कधीही गौरीची पर्सच्या आत काय असते ते बघितले नाही.  प्रत्येकाला आपल्या आयुष्यात एक स्पेस देणे गरजेचे आहे. बायको असो किंवा नवरा प्रत्येकाला एकमेकांचा आदर राखता यायला हवा असे त्याने म्हटले. तसेच मुलगा आर्यनलाही तो नेहमीच महिलांविषयी आदर करणे याविषयी सांगत असल्याचे सांगायलाही शाहरूख यावेळी विसरला नाही.


गौरी शाहरुखसोबत तेव्हापासून आहे ज्यावेळी तो सुपरस्टार बनला नव्हता. खरं तर लग्नानंतर शाहरुखने सिनेमांमध्ये काम करायला सुरुवात केली. एका इंटरव्हु दरम्यान गौरीने सांगितले होते की, हा प्रवास खूपच सुंदर होता. मी ज्यावेळी मुंबईत आले होते सुरुवातीला माझ्यासाठी सगळं जुळवून घेणे थोडे कठीण होते. मात्र मी तो ही प्रवास एन्जॉय केला. 

Web Title: Shahrukh Khan has not done so far, 'this' thing, read detailed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.