OMG!! शाहरूख व गौरीच्या ‘मन्नत’वर चालतो फक्त या व्यक्तिचा हुकूम, असं सांभाळते संपूर्ण घर

By ऑनलाइन लोकमत | Published: July 5, 2021 08:00 AM2021-07-05T08:00:00+5:302021-07-05T08:00:05+5:30

शाहरूख व गौरी दोघेही आपआपल्या फिल्ममध्ये टॉप प्लेअर आहे. पण ‘मन्नत’च्या आत चित्र जरा वेगळे आहे....

shahrukh khan home mannat is remote controlled bymother-in-law savita chibber | OMG!! शाहरूख व गौरीच्या ‘मन्नत’वर चालतो फक्त या व्यक्तिचा हुकूम, असं सांभाळते संपूर्ण घर

OMG!! शाहरूख व गौरीच्या ‘मन्नत’वर चालतो फक्त या व्यक्तिचा हुकूम, असं सांभाळते संपूर्ण घर

googlenewsNext
ठळक मुद्देगौरीची आई दिल्लीत राहते. पण दिल्लीतून त्या सगळा कारभार बघतात. 

अभिनेता शाहरुख खान (Shahrukh Khan) दीर्घकाळापासून मोठ्या पडद्यावरून गायब आहे. पण किंगखानचा दबदबा अद्यापही कायम आहे. याचमुळे किंगखानच नाही तर त्याची अख्खी फॅमिली या ना त्या कारणाने चर्चेत असते. किंगखानची पत्नी गौरी खान (Gauri Kkhan) हिचीची इंडस्ट्रीत एक मोठी ओळख आहे. इंडस्ट्रीतील नामवंत इंटिरिअर डिझाईनर म्हणून ती ओळखली जाते. एकंदर काय तर शाहरूख व गौरी दोघेही आपआपल्या फिल्ममध्ये टॉप प्लेअर आहे. पण ‘मन्नत’च्या आत चित्र जरा वेगळे आहे. होय, भलेही एसआरके बॉलिवूडचा बादशाह असेन, पण ‘मन्नत’मध्ये (Mannat) मात्र त्याच्या सासूबाईंचा हुकूम चालतो. होय, किंगखान काय आणि गौरी काय, दोघेही तिच्यापुढे ब्र सुद्धा काढत नाहीत.
होय, वाचून जरा आश्चर्य वाटेल पण, शाहरूख आणि गौरी यांच्या घराची अख्खी जबाबदारी गौरीची आई सविता चिब्बर (Savita Chibber ) सांभाळतात. खुद्द गौरीने एका मुलाखतीत हा खुलासा केला होता.
गौरीची आई दिल्लीत राहते. पण दिल्लीतून त्या सगळा कारभार बघतात. 

गौरी आणि शाहरुख दोघेही आपापल्या कामानिमित्त फारच व्यस्त असतात.  त्यांना घराकडे जास्त वेळ देता येत नाही.  अशात घरातील प्रत्येक कामावर सविता बारकाईने लक्ष ठेवतात. घरातील  सगळ्या स्टाफवर त्यांचा जबरदस्त वचक आहे. त्यांच्याकडून काम काढून घेणे, त्यांना मॅनेज करणे, ही सगळी जबाबदारी त्याच बघतात. त्यामुळे  त्या सतत व्हॉट्सअप व  फोनवर असतात. मन्नत बंगल्याची सूत्र ही सविता यांच्याच हातात आहेत.

गौरीने स्वत: एका मुलाखतीत ही माहिती दिली होती. ती म्हणाली  की, आईमुळे माझा सगळ्यांत मोठा आधार आहे. ती माझ्या घराची संपूर्ण जबाबदारी सांभाळते. अगदी दिल्लीत बसून सर्व काही मॅनेज करते. तिच्यामुळे मी आणि शाहरूख दोघेही निश्चिंतपणे आपआपले काम करू शकतो. वर्किंग वुमनसाठी घर आणि काम दोन्ही सांभाळणे म्हणजे तारेवरची कसरत असते. या दोन्ही जबाबदाºया पार पाडणे तणावपूर्ण असते. अशावेळी आई किंवा सासू दोघींपैकी एक असतील तर अनेक गोष्टी सोप्या होतात.

Web Title: shahrukh khan home mannat is remote controlled bymother-in-law savita chibber

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.