शाहरुख खानच्या 'जवान'ने रचला इतिहास; सर्वाधिक कमाई करणारा ठरला पहिला हिंदी सिनेमा

By ऑनलाइन लोकमत | Published: September 8, 2023 09:32 AM2023-09-08T09:32:41+5:302023-09-08T09:36:16+5:30

जिकडेतिकडे शाहरुखच्या चाहत्यांची क्रेझ पाहायला मिळत आहे. शाहरुख खानच्या जवानने पहिल्याच दिवशी रचला इतिहास,

Shahrukh khan jawan box office collection day 1 biggest hindi opener of all time earn 75 crores in india net | शाहरुख खानच्या 'जवान'ने रचला इतिहास; सर्वाधिक कमाई करणारा ठरला पहिला हिंदी सिनेमा

शाहरुख खानच्या 'जवान'ने रचला इतिहास; सर्वाधिक कमाई करणारा ठरला पहिला हिंदी सिनेमा

googlenewsNext

बहुचर्चित आणि बहुप्रतीक्षित किंग खानचा ‘जवान’ हा चित्रपट अखेर गुरुवारी प्रदर्शित झाला आहे. टीझरपासूनच शाहरुख खानच्या या चित्रपटासाठी प्रेक्षक आतुर होते. या चित्रपटातील शाहरुखचे वेगवेगळे लूक पाहून चाहतेही थक्क झाले होते. जवान चित्रपटाच्या अडव्हान्स बुकिंगला शाहरुखच्या चाहत्यांनी दमदार प्रतिसाद दिलेला पाहायला मिळाला. त्यानंतर आता चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतरही थिएटर हाऊसफूल होत आहेत. जिकडेतिकडे शाहरुखच्या चाहत्यांची क्रेझ पाहायला मिळत आहे. दरम्यान जवानचा पहिल्या दिवसाचे कलेक्शन समोर आलंय.  

‘जवान’ला मिळणारा प्रतिसाद पाहून शाहरुखही भारावून गेला आहे. ‘जवान’ची क्रेझ आणि चाहत्यांचं प्रेम पाहून किंग खान थक्क झाला आहे. अ‍ॅटली कुमार दिग्दर्शित यात नयनतारा, विजय सेतुपती, दीपिका पादुकोण, संजय दत्त आणि मराठमोळी गिरीज ओक असे अनेक दमदार कलाकार आहेत. शाहरुख खान यात मुख्य भूमिकेत दिसतोय. ‘जवान’ने पहिल्याच दिवशी कोट्यवधींची कमाई केली. 

 बॉक्सऑफिस ट्रॅकर सचनिकच्या रिपोर्टनुसार, जवानने भारतात पहिल्याच दिवशी सर्व भाषांमध्ये 75 कोटींची कमाई केली आहे.फक्त हिंदीत जवानने ६५ कोटी रुपयांची कमाई केली. हिंदीमध्ये सर्वात जास्त ओपनिंग करणारा जवान हा पहिला सिनेमा ठरला आहे. हिंदी व्यतिरिक्त जवानाने तेलुगू 5 तामिळ 5मध्ये इतक्या कोटींची कमाई केली आहे. इतकंच नाही तर बॉलिवूडमध्येही सर्वाधिक कमाई करणारा हा सिनेमा ठरला आहे.
 

Web Title: Shahrukh khan jawan box office collection day 1 biggest hindi opener of all time earn 75 crores in india net

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.