एखाद्या राजवाड्याइतका सुंदर आहे शाहरुख खानचा मन्नत बंगला, पाहा फोटो
By ऑनलाइन लोकमत | Published: May 6, 2020 08:00 AM2020-05-06T08:00:00+5:302020-05-06T08:00:02+5:30
मुंबईतील वांद्रेमधील बँड स्टँड या परिसरात शाहरुखचा मन्नत हा एखाद्या राजवाड्याप्रमाणे मोठा बंगला आहे.
हिंदी चित्रपटसृष्टीत काम करणाऱ्या कलाकारांचं जगणं, जीवनशैली आलिशान असते हे साऱ्यांना माहिती आहे. सेलिब्रिटी मंडळींवर रसिक जीव ओवाळून टाकतात. रसिकांचं या सेलिब्रिटींवर मनापासून प्रेम असतं. रसिकांच्या या प्रेमामुळेच सेलिब्रिटी मंडळी त्यांच्या करिअरमध्ये कोट्यवधींची कमाई करतात. दर महिन्याला सेलिब्रिटी गलेलठ्ठ कमाई करतात. करिअरच्या सर्वोच्च शिखरावर असताना होणाऱ्या कमाईचा आकडा पाहून अनेकांना धक्काही बसतो. आपल्या अभिनयाने शाहरुखने रसिकांच्या काळजात अढळ स्थान मिळवलं आहे.
करिअरच्या २७ वर्षांत शाहरुखने ‘डर’, ‘बाजीगर’, ‘दिलवाले दुल्हनियाँ ले जाएंगे’, ‘दिल तो पागल है’, ‘कुछ कुछ होता है’, ‘देवदास’, ‘चक दे इंडिया’ अशा विविध चित्रपटात एकाहून एक सरस भूमिका साकारल्या आहेत. या भूमिकांमुळेच रसिकांनी त्याला बादशाह आणि किंग अशी उपाधी दिली.
याच किंग खानचे घर देखील खऱ्याखुऱ्या राजाप्रमाणेच आहे. मुंबईतील वांद्रेमधील बँड स्टँड या परिसरात शाहरुखचा मन्नत हा एखाद्या राजवाड्याप्रमाणे मोठा बंगला आहे.
शाहरुख खान जिथे आज राहतोय ती जागा एका गुजराती माणसाची होती. हा गुजराती माणूस शाहरुख खानचा शेजारी होता. हा बंगला पाहिल्यावरच तो त्याला फार आवडला. त्यावेळेस या बंगल्याचं नाव होतं विल्ला विएन्ना. बंगला पाहताच क्षणी त्याच्या पसंतीस उतरल्याने या बंगल्याचा मालक नरिमन डबश यांच्याकडे त्याने बंगला विकण्याची विनंती केली. मात्र तो मालक काही तयार होईना. शेवटी फार याचना केल्यानंतरच मालक राजी झाला आणि शाहरुख खानने तो बंगला विकत घेतला. २००१ साली त्याने हा बंगला विकत घेताना त्याची किंमत जवळपास १३.३२ कोटी एवढी होती. आता या बंगल्याची किंमत २००-२५० कोटींच्या दरम्यान आहे.
या बंगल्याचं वैशिष्ट्य म्हणजे ६ हजार स्क्वेअर फुट जागेवर हा बंगला पसरलेला आहे. अनेक लोक या बंगल्यात राहू शकतात एवढा मोठा हा बंगला आहे. या बंगल्यात अनेक प्रशस्त खोल्या आहेत. मन्नत व्हाईट मार्बलपासून बनवण्यात आलेला असून या बंगल्याच्या आत एका मजल्यावरून दुसऱ्या मजल्यावर जायला लिफ्ट उपलब्ध आहे. या बंगल्याचे इंटेरिअरदेखील खूपच छान असून इंटेरिअरचं संपूर्ण काम त्याची पत्नी गौरीने केलेले आहे.