काय सांगता? सर्वाधिक कमाई करणाऱ्या चित्रपटांमधून शाहरुख गायब?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 31, 2019 07:15 PM2019-03-31T19:15:23+5:302019-03-31T19:20:04+5:30

सध्या किंग खानचा प्रभाव कमी होताना दिसतो आहे. कारण बॉक्स ऑफिसवर सर्वाधिक कमाई करणाऱ्या टॉप दहा हिंदी चित्रपटांच्या यादीत शाहरुखचा एकही चित्रपट नाही.

Shahrukh khan missing from highest grossing films? | काय सांगता? सर्वाधिक कमाई करणाऱ्या चित्रपटांमधून शाहरुख गायब?

काय सांगता? सर्वाधिक कमाई करणाऱ्या चित्रपटांमधून शाहरुख गायब?

googlenewsNext

बॉलिवूडचा ‘किंग खान’ म्हणून मिरवणारा अभिनेता शाहरुख खानची जादू आता ओसरलीय का? असा प्रश्न आम्हाला पडला. होय, त्याला कारणही तसंच आहे. या इंडस्ट्रीत शाहरूखला जवळपास २६ वर्ष पूर्ण झाली. या २६ वर्षांच्या कारकिर्दीत शाहरुखने एकापेक्षा एक दमदार चित्रपटांमध्ये भूमिका साकारल्या. पण सध्या किंग खानचा प्रभाव कमी होताना दिसतो आहे. कारण बॉक्स ऑफिसवर सर्वाधिक कमाई करणाऱ्या टॉप दहा हिंदी चित्रपटांच्या यादीत शाहरुखचा एकही चित्रपट नाही. सलमान खान आणि आमिर खानच्या तुलनेत शाहरुखच्या चित्रपटांना आता पहिल्यासारखा प्रतिसाद मिळत नाही हे या यादीतून दिसून येत आहे.



 

ताज्या माहितीनुसार, चित्रपट व्यापार विश्लेषक तरण आदर्शने ही यादी ट्विटर अकाऊंटवर शेअर केली आहे. यामध्ये पहिल्या क्रमांकावर एस.एस.राजामौली यांचा ‘बाहुबली २’ आहे. तर दुसऱ्या  स्थानावर आमिरचा ‘दंगल’, तिसऱ्या  स्थानावर रणबीर कपूरचा ‘संजू’ आणि चौथ्या स्थानावर पुन्हा एकदा आमिरचा ‘पीके’ हा चित्रपट आहे. सलमान खानचे ‘टायगर जिंदा है’ ‘बजरंगी भाईजान’ आणि ‘सुलतान’ हे तीन चित्रपट या यादीत अनुक्रमे पाचव्या, सहाव्या आणि आठव्या स्थानावर आहेत. रणवीर सिंग आणि दीपिका पादुकोणचा ‘पद्मावत’ सातव्या स्थानी आहे. तर विकी कौशलच्या ‘उरी : द सर्जिकल स्ट्राइक’ने बाजी मारत दहावं स्थान पटकावलं आहे.

शाहरुखच्या ‘चेन्नई एक्स्प्रेस’ आणि ‘हॅप्पी न्यू इअर’ या दोन चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर २०० कोटींचा आकडा पार केला होता. पण त्यानंतर त्याच्या चित्रपटांना काही विशेष प्रतिसाद मिळाला नाही. ‘दिलवाले’, ‘फॅन’, ‘जब हॅरी मेट सेजल’, ‘झिरो’ या चित्रपटांची कमाई जेमतेम झाली. त्यामुळे किंग खान शाहरूखची बॉक्स ऑफिसवरील जादू ओसरली का? असा प्रश्न चाहत्यांना पडला आहे.

Web Title: Shahrukh khan missing from highest grossing films?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.