Fact Check: शाहरूख खानचा नवा लुक पाहून चाहते शॉक्ड, जाणून घ्या व्हायरल फोटोमागची रिअल स्टोरी

By ऑनलाइन लोकमत | Published: February 27, 2023 03:49 PM2023-02-27T15:49:40+5:302023-02-27T15:50:29+5:30

Shahrukh Khan  : सध्या शाहरूखचा नव्या लुकमधील एक फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय...किंगखानचा असा लुक याआधी तुम्ही कधीच पाहिला नसेल....

shahrukh khan photoshopped new look photo viral on social media | Fact Check: शाहरूख खानचा नवा लुक पाहून चाहते शॉक्ड, जाणून घ्या व्हायरल फोटोमागची रिअल स्टोरी

Fact Check: शाहरूख खानचा नवा लुक पाहून चाहते शॉक्ड, जाणून घ्या व्हायरल फोटोमागची रिअल स्टोरी

googlenewsNext

बॉलिवूडचा 'किंग खान' शाहरूख खान (Shahrukh Khan ) गेल्या काही दिवसांपासून प्रचंड चर्चेत आहे. शाहरूखचा 'पठाण' हा सिनेमा अद्यापही चित्रपटगृहांत गर्दी खेचतोय. गेल्या ३२ दिवसांत या सिनेमाने देशभर ४९९.८५ कोटींची कमाई केली आहे. साहजिकच एसआरके सध्या खुश्श आहे. शाहरूख दीर्घकाळापासून इंडस्ट्रीत आहे. यादरम्यान शाहरूखने अनेक धाटणीच्या भूमिका साकारल्या. वेगवेगळ्या चित्रपटात वेगवेगळ्या लुकमध्ये दिसला. कधी पोनीटेल घातलेला, कधी केस वाढवलेला असा त्याचा प्रत्येक लुक चाहत्यांना आवडला. पण आता शाहरूखचा एक लुक समोर आला आहे. याआधी किंगखानचा असा लुक तुम्ही कधीच पाहिला नसेल. सध्या शाहरूखचा नव्या लुकमधील एक फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय.

बारीक कापलेले केस, हलकी दाढी, भुवयांवर एक कट, कानात ईअररिंगसारखं काही, निळे डोळे आणि मानेवर एक टॅटू असा त्याचा हा लुक एकदम नवा आहे. शाहरूखच्या एका चाहत्याने हा लुक शेअर केला आहे. 'जवान' या आगामी सिनेमात शाहरूख असा दिसणार, असं त्याने हा फोटो शेअर करत लिहिलंय. शाहरूखचा हा लुक पाहून काही चाहते क्रेझी झाले आहेत. त्यांना एसआरकेचा हा लुक भलताच आवडला आहे.

तुम्हीही या लुकच्या प्रेमात पडला असाल तर जरा थांबा. कारण हा एडिटेड फोटो आहे. होय, ही केवळ चाहत्याची कलाकारी आहे. त्यामुळेच 'जवान'शी या लुकचा काहीही संबंध नाही. वर्कफ्रंटबद्दल सांगायचं तर, 'पठाण' या चित्रपटानंतर शाहरूख 'जवान' या चित्रपटात दिसणार आहे. याशिवाय राजकुमार हिराणींच्या 'डंकी' या चित्रपटातही तो झळकणार आहे.

Web Title: shahrukh khan photoshopped new look photo viral on social media

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.