माता ने बुलाया है! जवानच्या रिलीज आधी शाहरुख खान वैष्णो देवीच्या दर्शनाला

By ऑनलाइन लोकमत | Published: August 30, 2023 04:21 PM2023-08-30T16:21:26+5:302023-08-30T16:38:47+5:30

‘पठाण’च्या रिलीज पूर्वीदेखील शाहरुख खानने कटरा येथील वैष्णोदेवी मंदिरालाही भेट दिली होती. आता अभिनेता वैष्णोदेवीच्या दर्शनला पोहोचला आहे.

Shahrukh khan reached the court of mata vaishno devi before the release of the film jawan | माता ने बुलाया है! जवानच्या रिलीज आधी शाहरुख खान वैष्णो देवीच्या दर्शनाला

माता ने बुलाया है! जवानच्या रिलीज आधी शाहरुख खान वैष्णो देवीच्या दर्शनाला

googlenewsNext

‘पठाण’ नंतर बॉलिवूडचा किंग शाहरुख खान पुन्हा एकदा धमाका करण्यासाठी सज्ज झाला आहे. सगळीकडे त्याच्या आगामी ‘जवान’ चित्रपटाची चर्चा सुरू आहे. ‘पठाण’प्रमाणेच शाहरुखच्या ‘जवान’ चित्रपटाचीही चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत.हा चित्रपट ७ सप्टेंबर रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. सध्या सिनेमाच्या प्रमोशनमध्ये अभिनेता व्यस्त असलेल्या  शाहरुख जम्मूच्या कटरा येथील वैष्णोदेवीच्या दर्शनासाठी गेला होता. वैष्णोदेवीच्या दरबारात जाऊन चित्रपटासाठी आशीर्वाद घेतले. त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. शाहरुखने गेल्या वर्षी डिसेंबर महिन्यात वैष्णोदेवीचे दर्शनही घेतले होते.


चेन्नईमध्ये ‘जवान’ सिनेमाचं म्यझिक लॉन्स सोहळा पार पडणार आहे. पण त्याआधी किंग खान जम्मू याठिकाणी पोहचला आहे. वैष्णोदेवीच्या दरबारात जाताना अभिनेत्याने निळ्या रंगाचा जॅकेट आणि मास्क लावला आहे. त्याच्या आजूबाजूला प्रचंड सुरक्षेचा ताफा होता. ‘पठाण’च्या रिलीज पूर्वीदेखील शाहरुख खानने कटरा येथील वैष्णोदेवी मंदिरालाही भेट दिली होती. आता अभिनेता वैष्णोदेवीच्या दरबारात पोहोचला आहे.

शाहरुख खानच्या ‘जवान’ चित्रपटाचं दिग्दर्शन अटली कुमारने केलं आहे. या चित्रपटात नयनतारा, विजय सेतुपथी यांच्या महत्त्वाच्या भूमिका आहेत. ‘जवान’मध्ये बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पदुकोणही झळकणार आहे. याबरोबरच मराठमोळी अभिनेत्री गिरीजा ओकही या चित्रपटात महत्त्वाची भूमिका साकारताना दिसणार आहे. शाहरुखचा जवान ७ सप्टेंबरला सर्वत्र प्रदर्शित होणार आहे.

Web Title: Shahrukh khan reached the court of mata vaishno devi before the release of the film jawan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.