'मन्नत'साठी शाहरुखने मोजलेले अतिरिक्त पैसे, आता महाराष्ट्र सरकारकडून मिळणार ९ कोटींचा रिफंड

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 25, 2025 10:16 IST2025-01-25T10:15:28+5:302025-01-25T10:16:01+5:30

शाहरुख खानला महाराष्ट्र सरकारकडून मन्नतसाठी मोठ्या रकमेचा रिफंड मिळणार आहे. काय आहे नेमकं प्रकरण? (shahrukh khan)

shahrukh khan refund from maharashtra government for his property mannat | 'मन्नत'साठी शाहरुखने मोजलेले अतिरिक्त पैसे, आता महाराष्ट्र सरकारकडून मिळणार ९ कोटींचा रिफंड

'मन्नत'साठी शाहरुखने मोजलेले अतिरिक्त पैसे, आता महाराष्ट्र सरकारकडून मिळणार ९ कोटींचा रिफंड

शाहरुख खानबद्दल एक मोठी अपडेट समोर आली आहे. २०२२ साली शाहरुखने एक याचिका दाखल केली होती. त्यानुसार 'मन्नत' ज्या जागेवर उभं आहे त्या जमिनीसाठी शाहरुखने अतिरिक्त पैसे मोजले होते. मुंबई उपनगरीय जिल्ह्याचे कलेक्टर यांच्याकडे ही रक्कम जमा करण्यात आली होती. अखेर दोन वर्षांनंतर महाराष्ट्र सरकारने या याचिकेला मंजुरी दिली असून शाहरुखला सरकारकडून रिफंड मिळणार आहे.

शाहरुखला मिळणार ९ कोटी रुपये रिफंड

शाहरुखचा मन्नत बंगला राज्य सरकारच्या जमिनीवर स्थित आहे. या जमिनीच्या मूळ मालकाने नंतर ही जमीन शाहरुखला विकली. पुढे शाहरुखने २४४६ स्केअर फीटमध्ये मन्नतची निर्मिती केली. ही जागा नंतर मूळ मालकाने शाहरुख आणि गौरी खानच्या नावावर रजिस्टर केली. पुढे शाहरुखने एका सरकारी पॉलिसीनुसार मार्च २०१९ मध्ये या प्रॉपर्टीची २७.५० कोटी रुपये इतकी रक्कम सरकारकडे जमा केली.

सरकारकडून अनावधानाने घडलेली चूक

मीडिया रिपोर्टनुसार, प्रॉपर्टीची रक्कम कॅलक्यूलेट करताना सरकारकडून अनावधानाने एक चूक घडली. सरकारने  त्यावेळी जमिनीच्या तुकड्याची किंमत ग्राह्य न धरता बंगल्याची किंमत ग्राह्य धरली. त्यामुळे २०२२ साली शाहरुख खान आणि कुटुंबाने सरकारला ही चूक निदर्शनास आणून देण्यासाठी याचिका दाखल केली. याशिवाय गौरी खानने कलेक्टर आणि मिनिस्टरी ऑफ सोशल डेव्हलपमेंट (MSD) समोर एक प्रेंझेटेशन केलं. फ्री प्रेस जर्नलच्या रिपोर्टनुसार, सरकारने याचिकेला मंंजूरी दिली असून महाराष्ट्र सरकार शाहरुख खानला रिफंड करणार आहे. ही किंमत तब्बल ९ कोटी इतकी आहे.

Web Title: shahrukh khan refund from maharashtra government for his property mannat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.