OMG!! अबरामला अजिबात आवडत नव्हती काजोल, शाहरूखने स्वत: सांगितले होते कारण
By ऑनलाइन लोकमत | Published: August 31, 2021 06:35 PM2021-08-31T18:35:42+5:302021-08-31T18:36:17+5:30
होय, कधीकाळी शाहरूखचा लहान मुलगा अबराम काजोलचा प्रचंड राग करायचा. काजोल समोर दिसली तरी अबरामची चिडचिड व्हायची...
शाहरूख खान (Shahrukh Khan) व काजोल (Kajol) यांची जोडी म्हणजे बॉलिवूडची सर्वाधिक रोमॅन्टिक जोडी. चाहते या जोडीवर अगदी फिदा आहेत. आजही या जोडीची क्रेझ कायम आहे. दोघांनी एकत्र असे अनेक सिनेमे दिलेत आणि या सिनेमांना प्रेक्षकांचे भरभरून प्रेम दिले. शाहरूख व काजोल यांची रिल लाईफ केमिस्ट्रीची चर्चा नेहमीच होते. पण ख-या आयुष्यातही दोघे एकमेकांचे खूप चांगले मैत्री आहेत. शिवाय काजोल शाहरूखच्या कुटुंबाच्या अगदी जवळ आहे. अर्थात अबराम सोडून. होय, कधीकाळी शाहरूखचा लहान मुलगा अबराम (Abram) काजोलचा प्रचंड राग करायचा. काजोलचा फोटो पाहिला तरी अबरामचा राग राग व्हायचा. खुद्द शाहरूखने एका मुलाखतीत हा खुलासा केला होता.
अबरामला काजोल अजिबात आवडायची नाही. अर्थात यामागे एक कारण होते. हाच किस्सा शाहरूखने ‘दिलवाले’ या सिनेमाच्या ट्रेलर लॉन्चवेळी शेअर केला होता. त्याने सांगितले होते की, ‘सिनेमाचे शूट सुरू होते. शूटींगदरम्यान एका सीनमध्ये मी जखमी होतो. अबराम सेटवर हजर होता. मला दुखापत झाली हे पाहून तो घाबरला आणि हे सर्व काजोलमुळेच झाल्याचे वाटले. यानंतर तो सेटवर इतका अपसेट झाला की, काजोलकडे रागारागात बघू लागला. शाहरुखचा खलनायकासोबत सीन असेल तर अबरामला एवढी भीती वाटत नव्हती जेवढी काजोलसोबत माझा सीन असेल तेव्हा असायची. आम्ही दोघांनी एकत्र काम केलेले अबरामला आवडत नव्हते.’
तसे केवळ अबराम नाही तर कधीकाळी शाहरूखलाही काजोल अजिबात आवडायची नाही. एका मुलाखतीत त्याने काजोलसोबत ‘बाजीगर’ सिनेमात काम करण्याचा अनुभव शेअर केला होता. तो म्हणाला होती की, ‘मी बाजीगरमध्ये काजोलसोबत काम केले होते. आमिरही एका सिनेमात काजोलला घेऊ इच्छित होता. त्याने मला तिच्याबद्दल विचारले. मी त्याला काजोलला न घेण्याचा सल्ला दिला होता. ती फार वाईट आहे. कामावर अजिबात फोकस नाहीये. तू तिच्यासोबत काम करूच शकणार नाहीस, असे मी आमिरला स्पष्टपणे सांगितले होते. पण यानंतर बाजीगर सिनेमातील तिचे काम बघून मी पुन्हा आमिरला कॉल केला होता. ती सेटवर वेगळी असेल पण स्क्रिनवर ती जादू करते, असे मी त्याला सांगितले होते.’