शाहरुख खानने म्हटले, ‘माझ्या चित्रपटाच्या सेटवर महिलांची छेड काढण्याची कोणात हिंमत नाही’
By ऑनलाइन लोकमत | Published: January 31, 2018 03:44 PM2018-01-31T15:44:43+5:302018-01-31T21:14:43+5:30
बॉलिवूड किंग शाहरुख खान त्याच्या साहसी वृत्तीसाठी ओळखला जातो. याचा प्रत्यय वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम शिखरच्या संमेलनाच्या क्रिस्टल समारंभात बघावयास ...
ब लिवूड किंग शाहरुख खान त्याच्या साहसी वृत्तीसाठी ओळखला जातो. याचा प्रत्यय वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम शिखरच्या संमेलनाच्या क्रिस्टल समारंभात बघावयास मिळाला. याठिकाणी त्याला सन्मानित करण्यात आले. हॉलिवूडमध्ये अभिनेत्रींबरोबर होत असलेल्या लैंगिक शोषणावर बोलताना शाहरुखने म्हटले की, ‘माझ्या चित्रपटाच्या सेटवर महिलांची छेड काढण्याची कोणात हिंमत नाही.’ बीबीसी वर्ल्ड न्यूजसोबत बोलताना शाहरुखने म्हटले की, ‘जेव्हा मी एखाद्या चित्रपटाची निर्मिती करीत असतो किंवा एखाद्या चित्रपटात काम करीत असतो तेव्हा आमची महिलांप्रतीची वागणूक एकदम स्पष्ट असते. विशेष म्हणजे, महिलांच्या बारीकसारीक गोष्टीही आम्ही लक्षात घेत असतो. जसे की, चित्रपटाच्या टायटलमध्ये महिलांचे नाव सुरुवातीला दाखविणे. वास्तविक असे केल्यास फारसा फरक पडत नाही, परंतु त्यांच्याप्रती सन्मान दाखविण्याचा हा आमचा प्रयत्न असतो.’
दरम्यान, सध्या शाहरुख त्याच्या अलिबाग येथील फार्म हाउसमुळे चर्चेत आहे. आयकर विभागाने त्याचे फार्म हाउस सील केले आहे. शाहरुखवर आरोप आहे की, त्याने शेती करण्याच्या उद्देशाने अलिबाग येथे जमीन खरेदी केली; परंतु त्याठिकाणी त्याने बेकायदेशीररीत्या बंगला बांधला. आता त्याला ९० दिवसांच्या आत या सर्व प्रकरणी आपली बाजू मांडावी लागणार आहे. शाहरुखने ही जमीन खरेदी करण्यासाठी एक कंपनी रजिस्टर केली. या कंपनीच्या माध्यमातून बनावट कागदपत्रे तयार करून तब्बल आठ कोटी रुपयांच्या आसपास कर्ज घेतले, असा त्याच्यावर आरोप आहे.
सध्या शाहरुख त्याच्या आगामी ‘झिरो’ या चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. या चित्रपटात तो एका बुटक्या व्यक्तीची भूमिका साकारत आहे. शाहरुखव्यतिरिक्त त्याच्या या चित्रपटात अभिनेत्री अनुष्का शर्मा आणि कॅटरिना कैफ दिसणार आहेत. सलमान खानही शाहरुखच्या प्रेमापोटी या चित्रपटात कॅमिओ करताना बघावयास मिळणार आहे.