Aryan Khan Drugs Case: darknet च्या माध्यमातून आर्यनने केलं ड्रग्जचं पेमेंट? NCB चा नवा दावा
By ऑनलाइन लोकमत | Published: October 24, 2021 02:21 PM2021-10-24T14:21:32+5:302021-10-24T14:21:57+5:30
Aryan Khan Drugs Case:या प्रकरणी एनसीबी अधिक तपास करत असून त्यांनी एक नवा दावा केला आहे. यात आर्यन आणि त्याच्या मित्रांनी ड्रग्जची खरेदी-विक्री डार्कनेटच्या (darknet) माध्यमातून केल्याचं म्हटलं जात आहे.
ड्रग्ज पार्टी प्रकरणी (Aryan Khan Drugs Case) अभिनेता शाहरुख खानचा (Shah Rukh Khan) लेक आर्यन खान (Aryan Khan) सध्या मुंबईतील आर्थर रोड तुरुंगात आहे. या प्रकरणी एनसीबी (NCB) अधिक तपास करत असून त्यांनी एक नवा दावा केला आहे. यात आर्यन आणि त्याच्या मित्रांनी ड्रग्जची खरेदी-विक्री डार्कनेटच्या (darknet) माध्यमातून केल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. हे पेमेंट आर्यन खान किंवा त्याच्या कोणत्या मित्रांनी केलं हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही. मात्र, पुढील तपास एनसीबी करत आहे. २६ ऑक्टोबर रोजी आर्यन, मर्चेंट आणि मुनमुन धमेचा यांच्या जामीन अर्जावर सुनावणी होणार आहे. त्यापूर्वी एनसीबी या तिघांविरोधात पुरावे गोळा करण्याचं काम करत आहे.
'PTI 'च्या वृत्तानुसार, आर्यन आणि त्याच्या मित्रांकडून हाइड्रोपोनिक वीड जप्त करण्यात आले आहेत. साधारणपणे या हाइड्रोपोनिक वीड २० असून त्याची खरेदी डार्कनेटच्या माध्यमातून करण्यात आली आहे. एनसीबीने टाकलेल्या छाप्यामध्ये काही आरोपींकडून एमडीएमए जप्त करण्यात आलं होतं. एनसीबी अधिकाऱ्यांच्या मतानुसार, हे ड्रग्स खासकरुन युरोप आणि अमेरिका येथून मागवण्यात आले होते. या ड्रग्जच्या खरेदीचं पेमेंट डार्कनेटच्या माध्यमातून करण्यात आलं होतं.
Aryan Khan Drugs Case: आर्यनला ड्रग्स पुरवणाऱ्या व्यक्तीचं नाव आलं समोर; अनन्या पांडेने केला खुलासा
डार्कनेट म्हणजे काय?
डार्कनेट हे एक secret internet portal आहे. या पोर्टलच्या माध्यमातून केवळ सॉफ्टवेअर, कॉन्फिगरेशनसोबतच त्याचं अॅक्सेस केलं जातं. एनसीबीने क्रुझवर छापेमारी केल्यानंतर डार्कनेट आणि बिटाकॉइनचा उल्लेख केला होता. त्यानंतर आता या डार्कनेटच्या माध्यमातून कशा प्रकारे ड्रग्जची खरेदी झाली हे सांगितलं आहे. विशेष म्हणजे अनेक दहशतवादी हल्ल्यांच्यावेळी डार्कनेटच्या माध्यमातूनच शस्त्रास्त्रांची खरेदी करण्यात आली होती. डार्कनेटच्या माध्यमातून बेकायदेशीररित्या वस्तूंची खरेदी-विक्री केली जाते.
आर्यनकडे ड्रग्ज सापडले नाहीत
एनसीबीने क्रुझवर केलेल्या छापेमारीत आर्यनकडे कोणत्याही प्रकारचे ड्रग्ज सापडले नाहीत. परंतु, आर्यन एका मोठ्या नेटवर्कचा भाग असल्याचा आरोप एनसीबीने केला आहे. ३ ऑक्टोबर रोजी आर्यनसह आठ जणांना ताब्यात घेण्यात आलं गोतं. त्यानंतर एनसीबीने अनेक ठिकाणी छापेमारी करत महिन्याभरात १२ जणांना ताब्यात घेतलं आहे.
२६ ऑक्टोबरला आर्यनच्या जामीन अर्जावर सुनावणी
२६ ऑक्टोबरला आर्यन, मुनमुन धमेचा आणि मर्चेंट यांच्या जामीन अर्जावर सुनावणी होणार आहे. सध्या आर्यन मुंबईतील आर्थर रोड तुरुंगात आहे.