शाहरुख खान याचा मुलगा आर्यन खानचे फेसबुक अकाऊंट झाले हॅक!

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 22, 2019 15:10 IST2019-01-22T15:08:27+5:302019-01-22T15:10:10+5:30

किंगखान शाहरुख खान याचा मुलगा आर्यन खान याला फेसबुकवर फॉलो करणा-या चाहत्यांसाठी एक शॉकिंग बातमी आहे. होय, आर्यनचे फेसबुक अकाऊंट हॅक झालेय.

shahrukh khan son aryan khans facebook account hacked | शाहरुख खान याचा मुलगा आर्यन खानचे फेसबुक अकाऊंट झाले हॅक!

शाहरुख खान याचा मुलगा आर्यन खानचे फेसबुक अकाऊंट झाले हॅक!

ठळक मुद्देआर्यन सध्या विदेशात फिल्म मेकिंगचे शिक्षण घेत आहे. मध्यंतरी करण जोहर आर्यनला लॉन्च करणार, अशी बातमी होती.

किंगखान शाहरुख खान याचा मुलगा आर्यन खान याला फेसबुकवर फॉलो करणा-या चाहत्यांसाठी एक शॉकिंग बातमी आहे. होय, आर्यनचे फेसबुक अकाऊंट हॅक झालेय. खुद्द आर्यनने ही बातमी चाहत्यांची शेअर केली. 
 माझे फेसबुक अकाऊंट हॅक झाले आहे. त्यामुळे  या अकाऊंटवरुन कोणताही मेसेज,फोटो वा पोस्ट शेअर झाल्यास त्याकडे दुर्लक्ष करा, अशी पोस्ट आर्यनने इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये शेअर केली आहे.

 याआधीही अनेक बॉलिवूड सेलिब्रेटींचे सोशल अकाऊंट हॅक झाल्याचे समोर आले होते. यात शाहिद कपूर, अनुपम खेर, ऋषी कपूर, अभिषेक बच्चन, महेश भट्ट, करण जोहर, श्रुती हासन आणि अली जफर या सेलिब्रिटींचा समावेश होता. आता हॅकर्सनी थेट किंगखानचा मुलगा आर्यन खान याला लक्ष्य केले आहे. किंगखानचा मुलगा असल्याने अनेकांच्या नजरा आर्यनकडे असतात. त्यामुळेच बॉलिवूडमध्ये नसला तरी आर्यन जिथे जाईल तिथे त्याची हेडलाईन बनते.


आर्यन सध्या विदेशात फिल्म मेकिंगचे शिक्षण घेत आहे. मध्यंतरी करण जोहर आर्यनला लॉन्च करणार, अशी बातमी होती. करण जोहरच्या एका वक्त्व्याने या बातमीला हवा दिली होती. आर्यन जेव्हा केव्हा बॉलिवूड डेब्यू करणार, त्यात माझे सर्वात मोठे योगदान असेल. तो माझा मुलगा आहे. त्याला लॉन्चिंगबद्दल माझ्या मनात अनेक इच्छा आहेत, असे करण जोहरने या मुलाखतीत सांगितले होते. पण मध्यंतरी अ‍ॅक्टर बनण्यात आर्यनला कुठलाही रस नसल्याचे खुद्द शाहरूखनेचं स्पष्ट केले होते. आर्यनला हिरो बनण्यात कुठलाही इंटरेस्ट नाही. तो हिरो नाही तर चित्रपट बनवू इच्छितो. दिग्दर्शनात येऊ इच्छितो, असे शाहरूखने सांगितले होते.
 

Web Title: shahrukh khan son aryan khans facebook account hacked

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.