Ask SRK: सगळेच सिनेमे होताहेत फ्लॉप; शाहरुखने मारला अजय देवगणचा डायलॉग!
By ऑनलाइन लोकमत | Published: January 22, 2020 06:23 PM2020-01-22T18:23:10+5:302020-01-22T18:29:20+5:30
बॉलिवूड सुपरस्टार शाहरुख खान आज ट्विटरवर ट्रेंड होतो आहे.
बॉलिवूड सुपरस्टार शाहरुख खान आज ट्विटरवर ट्रेंड होतो आहे. त्यांने #AskSRK नावाचे सेशनला ट्विटरवर सुरु केले आहे. किंग खानने फॅन्सला प्रश्न विचारायला सांगितले आणि त्याच्या फॅन्सनी ही याला प्रतिसाद देत प्रश्नांचा भडिमार सुरु केला. अनेक गमतीशीर आणि इंटरेस्टिंग प्रश्न शाहरुखला त्याच्या फॅन्सनी विचारले आहेत. शाहरुखने आपल्या ट्विटरवर लिहिले की चला #AskSRK पण फक्त 20 प्रश्न.
Bas aap Dua mein yaad rakhna. https://t.co/YRYfCjR67K
— Shah Rukh Khan (@iamsrk) 22 January 2020
एका व्यक्तीने शाहरुखला ट्रोल करताना विचारले की, सध्या तुझे सगळे सिनेमा फ्लॉप जातायेत. तुला कसं वाटतंय, उत्तर नक्की दे. यावर शाहरुखने खूप मजेदार उत्तर दिले आहे. तो म्हणाला, '' बस आप दुआ में याद रखना.''
30 saal ki mehnat mein padega. https://t.co/Y3qfb7IMdk
— Shah Rukh Khan (@iamsrk) 22 January 2020
कित्येक शाहरूखचे चाहते आहेत जे शाहरूखच्या आगामी सिनेमाची वाट पाहत आहेत. एका चाहत्याने म्हटले की,तुमच्या नव्या प्रोजेक्टला घेऊन अनेक अफवा येत आहेत. प्लीज तुम्हीच तुमच्या आगामी चित्रपटाची घोषणा करा. त्यावर शाहरूखने सांगितले की, मीच अनाउंस करणार आणखीन कोण करणार भावा.
The ‘right thing’ is a personal feeling. Not based on anybody else’s expectations or demand. Its for your own self. Hatred and love for it should not define it...the right thing doesn’t look for gratification or acceptance...it just is. https://t.co/SI21rkyZq0
— Shah Rukh Khan (@iamsrk) 22 January 2020
शाहरूखला अभिनेता रितेश देशमुखने विचारलं की तू तुझा मुलगा अबरामला जीवनातील कोणता धडा शिकविला आहेस? त्यावर शाहरूख म्हणाला की, जेव्हा पण तुम्ही भुकेले असाल किंवा रागात, त्यावेळी तुम्हाला तुमचा आवडता गेम खेळत थोडे रडले पाहिजे.
I like cheese... https://t.co/U3XVh5hbkc
— Shah Rukh Khan (@iamsrk) 22 January 2020
शाहरूखच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचं तर शाहरूखने झिरो चित्रपटानंतर कोणत्याही नव्या सिनेमाची घोषणा केली नाही. या चित्रपटाचे दिग्दर्शन आनंद एल राय यांनी केले होते. या चित्रपटात शाहरूखसोबत अनुष्का शर्मा व कतरिना कैफ मुख्य भूमिकेत होती. हा सिनेमा २०१८ साली प्रदर्शित झाला होता. या चित्रपटानंतर शाहरूखच्या नव्या प्रोजेक्टबाबत तर्कवितर्क लावले जात आहे. यादरम्यान त्याचे नाव दिग्दर्शक राजकुमार हिराणीपासून दाक्षिणात्य दिग्दर्शक एटलीसोबत जोडले गेले होते.