शाहरुख खान उपचारासाठी अमेरिकेला जाणार, मुंबईत होऊ शकली नाही ट्रीटमेंट; नक्की झालं काय?

By ऑनलाइन लोकमत | Published: July 30, 2024 08:35 AM2024-07-30T08:35:21+5:302024-07-30T08:36:39+5:30

मुंबईतील रुग्णालयात उपाय करुनही परिस्थिती न सुधारल्याने तो आता अमेरिकेला जाऊन उपचार घेणार आहे.

Shahrukh Khan to undergo eye treatment in USA couldnt do as planned in mumbai | शाहरुख खान उपचारासाठी अमेरिकेला जाणार, मुंबईत होऊ शकली नाही ट्रीटमेंट; नक्की झालं काय?

शाहरुख खान उपचारासाठी अमेरिकेला जाणार, मुंबईत होऊ शकली नाही ट्रीटमेंट; नक्की झालं काय?

अभिनेता शाहरुख खानची (Shahrukh Khan) बॉलिवूडची बादशहा, रोमान्स किंग अशी ओळख आहे. रोमँटिक हिरो म्हणलं की आधी शाहरुखच नजरेसमोर येतो. दरम्यान किंग खानबाबत एक माहिती समोर येत आहे. शाहरुख डोळ्यांवरील उपचारासाठी तो परदेशात जाणार आहे. मुंबईतील रुग्णालयात उपाय करुनही परिस्थिती न सुधारल्याने तो आता अमेरिकेला जाऊन उपचार घेणार आहे.

'बॉलिवूड हंगामा'च्या रिपोर्टनुसार, शाहरुख खान सोमवारी २९ जुलै रोजी मुंबईतील रुग्णालयात डोळ्यांच्या उपचारासाठी गेला होता. मात्र काही कारणास्तव ट्रीटमेंट झाली नाही. त्यामुळे आज तो अमेरिकेला रवाना होणार आहे. शाहरुखची मॅनेजर पूजा ददलानीने अद्याप यावर अधिकृत भाष्य केलेले नाही. 

याआधी 2014 मध्ये शाहरुखची minor eye सर्जरी करण्यात आली होती. सर्जरीनंतर त्याची दृष्टी पूर्णत: व्यवस्थित झाली याबद्दल त्याने ट्वीट करत डॉक्टरांचे आभार मानले होते. 

यावर्षी आयपीएल फायनलआधी शाहरुखला उन्हाचा त्रास झाल्याने गुजरात येथील रुग्णालयात अॅडमिट करण्यात आले होते. त्याला डिहायड्रेशनचा  त्रास झाला होता. सध्या शाहरुखने कामातून काही दिवस ब्रेक घेतला आहे. अंबानींच्या लग्नसोहळ्यात तो दिसला होता. आता तो लेक सुहाना खानसोबतच्या 'किंग' या अॅक्शन थ्रिलर सिनेमात दिसणार आहे.

Web Title: Shahrukh Khan to undergo eye treatment in USA couldnt do as planned in mumbai

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.