Shahrukh चे एक ट्विट अन् Swiggy ची टीम जेवणाचा डब्बा घेऊन 'मन्नत'वर; फोटो व्हायरल...
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 13, 2023 18:31 IST2023-06-13T18:30:11+5:302023-06-13T18:31:07+5:30
Shahrukh Khan: बॉलिवूडचा किंग शाहरुख खानने AskSRK सेशन घेतले, यावेळी त्याच्या एका ट्विटची जोरदार चर्चा झाली.

Shahrukh चे एक ट्विट अन् Swiggy ची टीम जेवणाचा डब्बा घेऊन 'मन्नत'वर; फोटो व्हायरल...
Shahrukh Khan AskSrk: अभिनेता शाहरुख खान अनेकदा त्याच्या ट्विटर हँडलवर AskSrk द्वारे चाहत्यांच्या प्रश्नांची उत्तर देतो. त्याचे हे चिट-चॅट सत्र खूप मजेशीर असते. सोमवारीही शाहरुखने चाहत्यांसोबत चिट-चॅट सेशन केले. यावेळी शाहरुखने चाहत्यांच्या अनेक प्रश्नांची उत्तरे दिली. यावेळी चाहत्यांनी त्याला खाण्यापिण्याच्या सवयीपासून ते वैयक्तिक आयुष्यापर्यंत, अनेक प्रश्न विचारले. यावेळी शाहरुखने एका चाहत्याच्या ट्विटला दिलेल्या उत्तरानंतर फूड डिलिव्हरी अॅप स्विगीने आपली एक टीमच शाहरुखच्या घरी पाठवली.
Kyun bhai aap Swiggy se ho….bhej doge kya?? https://t.co/Jskh69QEqc
— Shah Rukh Khan (@iamsrk) June 12, 2023
रात्री जेवण घेऊन स्विगीची टीम शाहरुखच्या 'मन्नत'वर पोहोचले. शाहरुखच्या घराबाहेर 7 डिलिव्हरी बॉईजचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. दरम्यान, शाहरुख खान त्याच्या चाहत्यांच्या प्रत्येक प्रश्नाला अतिशय मजेशीरपणे उत्तर देतो. सोमवारी शाहरुखच्या 'आस्क मी एनीथिंग' सत्रात एका चाहत्याने त्याला 'खाना खाया क्या भाई?' विचारले. यावर शाहरुखने उत्तर दिले, "क्यों भाई आप स्विगी से हो...भेज दोगे क्या?" मग काय, स्विगीने या संधीचा फायदा घेतला.
स्विगीची टीम शाहरुखच्या घरी
hum swiggy wale hai aur hum dinner leke aagaye 🥰 https://t.co/iMFJcYjUVmpic.twitter.com/swKvsEZYhC
— Swiggy (@Swiggy) June 12, 2023
यानंतर काही वेळातच स्विगीच्या ट्विटर हँडलवर एक छायाचित्र पोस्ट करण्यात आले. यामध्ये स्विगीचे सात डिलिव्हरी बॉईज मन्नतच्या घराबाहेर शाहरुखसाठी जेवण घेऊन गेले. या फोटोला 'हम स्विगी वाले हैं हम डिनर लेकर आ गये' असे कॅप्शन दिले आहे. हे ट्विट सध्या खूप व्हायरल होत आहे.