४७.८ मिलियन फॉलोव्हर्स असणारा शाहरुख खान फक्त ५ महिलांना करतो फॉलो, जाणून घ्या कोण आहेत त्या?
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 2, 2025 18:02 IST2025-04-02T18:01:33+5:302025-04-02T18:02:38+5:30
Shah Rukh Khan : शाहरुख खानला आज कोणत्या परिचयाची गरज नाही. या अभिनेत्याने आपल्या करिअरमध्ये अनेक चित्रपट केले आहेत. अभिनेत्याची एक झलक पाहण्यासाठी चाहत्यांची गर्दी त्याच्या घराबाहेर तासनतास थांबलेली असते.

४७.८ मिलियन फॉलोव्हर्स असणारा शाहरुख खान फक्त ५ महिलांना करतो फॉलो, जाणून घ्या कोण आहेत त्या?
शाहरुख खान(Shah Rukh Khan)ला आज कोणत्या परिचयाची गरज नाही. या अभिनेत्याने आपल्या करिअरमध्ये अनेक चित्रपट केले आहेत. अभिनेत्याची एक झलक पाहण्यासाठी चाहत्यांची गर्दी त्याच्या घराबाहेर तासनतास थांबलेली असते. अनेक वर्षांच्या मेहनतीनंतर अभिनेत्याने हे प्रेम मिळवले आहे. सोशल मीडियावर त्याची क्रेझ काही कमी झालेली नाही. इंस्टाग्रामवरही त्याचे खूप फॅन फॉलोव्हर्स आहेत. मात्र किंग खान इंस्टाग्रामवर फक्त ६ लोकांना फॉलो करतो, त्यापैकी एक आहे आर्यन खान.
या यादीत पहिले नाव आहे त्याची पत्नी गौरी खानचे.गौरी खानने अभिनेत्याला प्रत्येक कठीण प्रसंगी साथ दिली आहे. अशा परिस्थितीत तिचे या यादीत पहिले नाव असणे योग्यच आहे. दोघे अनेकदा इव्हेंटमध्ये क्युट क्षण शेअर करताना दिसले आहेत.
त्यापाठोपाठ आता शाहरुखची लाडकी मुलगी सुहाना आहे, जिने आता बॉलिवूडच्या दुनियेत प्रवेश केला आहे. सुहाना तिच्या वडिलांच्या खूप जवळ आहे. शाहरुखही तिच्या प्रत्येक पोस्टवर मजेदार कमेंट्स करत राहतो जी खूप व्हायरल होते. पुढचे नाव आहे आलिया चिब्बा. ज्यांना माहित नाही त्यांच्यासाठी आम्ही तुम्हाला सांगतो की ही आहे शाहरुखची भाची आलिया. आलिया अनेकदा तिच्या चुलत बहिणी सुहाना, आर्यन आणि अबरामसोबतचे फोटो शेअर करत असते.
फॅमिली व्यतिरिक्त या महिलांना किंग खान करतो फॉलो
शाहरुखची मॅनेजर पूजा ददलानी केवळ त्याचे व्यावसायिक काम पाहत नाही तर ती गौरी आणि संपूर्ण कुटुंबाची जवळची मैत्रीण देखील आहे. २०१२ पासून ती शाहरुखच्या मॅनेजरची भूमिका साकारत आहे. तिला अनेकदा किंग खानसोबत स्पॉट केले आहे. आणखी एक नाव म्हणजे काजल आनंद, जिला फिल्म इंडस्ट्रीत 'पुतलू' म्हणूनही ओळखले जाते. याचा खुलासा खुद्द शाहरुखने केला आहे. ती अभिनेता आणि त्याच्या पत्नीची खूप जवळची मैत्रीण आहे. व्यवसायाने वकील असलेली काजल आता लाइफस्टाईल आणि फॅशन ब्रँड चालवते.
आर्यन खानलाही करतो फॉलो
या यादीत शेवटचं नाव त्याचा मोठा मुलगा आर्यन याचे आहे. आर्यनही त्याच्या वडिलांच्या खूप जवळचा असून तो लवकरच चित्रपटसृष्टीत दिग्दर्शनाच्या क्षेत्रात एन्ट्री करणार आहे. अलीकडेच त्याच्या शोची घोषणा करण्यात आली असून ज्यामध्ये अनेक बॉलिवूड स्टार्स दिसणार आहेत.
वर्कफ्रंट
किंग खानने २०२३ मध्ये 'पठाण', 'जवान' आणि 'डंकी' सारख्या सुपरहिट चित्रपटांसह पुनरागमन केले. या तीन चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर दमदार कामगिरी केली आणि शाहरुखची स्टार पॉवर पुन्हा एकदा सिद्ध केली. अभिनेता लवकरच किंग या चित्रपटात दिसणार आहे. याशिवाय अभिनेता त्याचा मुलगा आर्यन खानच्या शोमध्येही काम करणार आहे. या सुपरस्टारला पुन्हा पडद्यावर पाहण्यासाठी चाहते उत्सुक आहेत.