शाहरूख खानच्या कारने दिली फोटोग्राफरला धडक; पुढे काहीसे असे घडले!

By ऑनलाइन लोकमत | Published: March 16, 2017 12:07 PM2017-03-16T12:07:27+5:302017-03-16T17:53:05+5:30

गेल्या बुधवारी अभिनेत्री आलिया भट्ट हिच्या बर्थ डे पार्टीसाठी सेलिब्रिटींची एकच गर्दी झाली होती. पार्टीत किंग खान शाहरूखनेही हजेरी ...

Shahrukh Khan's car hits the photographer; Someday it happened! | शाहरूख खानच्या कारने दिली फोटोग्राफरला धडक; पुढे काहीसे असे घडले!

शाहरूख खानच्या कारने दिली फोटोग्राफरला धडक; पुढे काहीसे असे घडले!

googlenewsNext
ल्या बुधवारी अभिनेत्री आलिया भट्ट हिच्या बर्थ डे पार्टीसाठी सेलिब्रिटींची एकच गर्दी झाली होती. पार्टीत किंग खान शाहरूखनेही हजेरी लावून चार चॉँद लावले होते. परंतु तो येत असताना एक अशी काही घटना घडली की, ज्यामुळे जीवित हानी होण्याची शक्यता निर्माण झाली होती. परंतु नशीब बलवत्तर म्हणून ही घटना टळली. 

त्याचे झाले असे की, शाहरूख आलियाच्या जुहू स्थित बंगाल्यात पार्टीसाठी पोहोचला होता. पार्किंगमध्ये शाहरूखची कार येता एकच धावपळ उडाली. फोटोग्राफर्स आणि लोकांनी त्याची एक छबी टिपण्यासाठी त्याच्या कारभोवती गर्दी केली. परंतु यामुळे दीपक हुड्डा नावाचा एक फोटोग्राफर त्याच्या कारला धडकला; मात्र ड्रायव्हरला याची अजिबात खबरबात नव्हती. त्यामुळे मोठी दुर्घटना होणार अशीच काहीशी चर्चा होती. आरडाओरड केल्यानंतर ड्रायव्हरने कारवर ताबा मिळविला; मात्र यावेळी त्या फोटोग्राफरच्या पायाला किरकोळ मार लागला. 



जेव्हा ही बाब शाहरूखला कळाली तेव्हा त्याने लगेचच आपल्या बॉडीगार्डला बोलावून घेतले. त्यांना त्या फोटोग्राफरला तातडीने रुग्णालयात घेऊन जाण्यास सांगितले. तसेच त्या फोटोग्राफरची उपचार होईपर्यंत व्यवस्थित काळजी घेतली जावी, असेही एकप्रकारचे आदेश दिले. त्यानंतर तातडीने त्या फोटोग्राफरला नानावती हॉस्पिटलमध्ये दाखल केले गेले. वृत्तानुसार त्या फोटोग्राफरवर शाहरूखच्या फॅमिली डॉक्टरांनी उपचार केले असून, त्याचा खर्चही शाहरूखनेच दिला आहे. 

प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, यासंपूर्ण घटनाकाळात शाहरूख खूपच विनम्र असल्याचे बघावयास मिळाले. त्याने यावेळी संबंधित फोटोग्राफरला दिलासाही दिला. त्याने मी स्वत: याप्रकरणी लक्ष देणार असल्याचे फोटोग्राफरला सांगितले. त्याला रुग्णालयात पाठविल्यानंतर शाहरूख आलियाला भेटायला गेला. तिला शुभेच्छा दिल्यानंतर तो पार्टीत सहभागी झाला. 

Web Title: Shahrukh Khan's car hits the photographer; Someday it happened!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.