अबब! किंग खानची जबरदस्त क्रेझ; रिलीजपूर्वीच 'जवान'ने केली 250 कोटींची कमाई

By ऑनलाइन लोकमत | Published: September 25, 2022 05:37 PM2022-09-25T17:37:35+5:302022-09-25T17:38:12+5:30

गेल्या काही वर्षांपासून फ्लॉप चित्रपट देणारा अभिनेता शाहरुख खान एका जबरदस्त कमबॅकसाठी सज्ज झाला आहे.

Shahrukh Khan's Craze; before its release, 'Jawan' earned 250 crores from rights | अबब! किंग खानची जबरदस्त क्रेझ; रिलीजपूर्वीच 'जवान'ने केली 250 कोटींची कमाई

अबब! किंग खानची जबरदस्त क्रेझ; रिलीजपूर्वीच 'जवान'ने केली 250 कोटींची कमाई

googlenewsNext

SRK Jawan: गेल्या काही वर्षांपासून फ्लॉप चित्रपट देणारा अभिनेता शाहरुख खान (Shah Rukh Khan) जबरदस्त कमबॅकसाठी सज्ज झाला आहे. यातच आता शाहरुख त्याचा आगामी 'जवान' चित्रपटामुळे खूप चर्चेत आला आहे. याचे कारण म्हणजे, सुपरहिट तमिळ दिग्दर्शक अॅटली कुमार (Atlee) या चित्रपटाचे दिग्दर्शन करत आहे, तर खलनायकाच्या भूमिकेत अभिनेता विजय सेतुपती (Vijay Sethupathy) आहे. विशेष म्हणजे, यात सुपरस्टार थालापती विजयचा कॅमिओ अपिअरन्सदेखील असणार आहे.


शाहरुखचे चित्रपट चर्चेत
जवळपास पाच वर्षांपासून चित्रपटापासून दूर गेलेला किंग खान जबरदस्त कमबॅकसाठी सज्ज झाला आहे. शाहरुखचा आगामी 'जवान', 'पठाण' आणि 'डंकी', हे तीन चित्रपट चर्चेत आहेत. या वर्षी जून महिन्यात शाहरुख खानने एक व्हिडिओ शेअर करून 'जवान' चित्रपटाची घोषणा केली होती. व्हिडिओमध्ये शाहरुखचा लूक पाहून चाहते वेडे झाले. हा एक अॅक्शनपट असून, चाहत्यांमध्ये या चित्रपटाची प्रचंड उत्सुकता आहे. यूट्यूबवर जवाच्या पहिल्या व्हिडिओलाच 29 मिलियन व्ह्यूज आले आहेत. 

'जवान'ची रिलीजपूर्वी मोठी कमाई
'जवान'ने रिलीजपूर्वी बजेटपेक्षा जास्त कमाई केली आहे. साऊथ सिनेसृष्टीत मोठे हिट चित्रपट देणाऱ्या दिग्दर्शक अॅटलीसोबत शाहरुखच्या कामाची लोकांमध्ये अशी क्रेझ आहे की, 'जवान'च्या राईट्ससाठी जोरदार स्पर्धा लागली होती. रिपोर्ट्सनुसार, नेटफ्लिक्सने शाहरुखच्या ‘जवान’चे ओटीटी हक्क विकत मिळवण्यासाठी 120 कोटींचा करार केला आहे. तसेच, सॅटेलाइट राइट्ससाठी झी टीव्हीने विकत घेतले आहेत. 180 कोटी बजेट असलेल्या 'जवान'ने आतापर्यंत 250 कोटींची कमाई केली आहे. 

Web Title: Shahrukh Khan's Craze; before its release, 'Jawan' earned 250 crores from rights

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.