शाहरुख खानचा 'डंकी' हा दाक्षिणात्य चित्रपटाचा रिमेक? जाणून घ्या या मागचे सत्य
By ऑनलाइन लोकमत | Published: November 8, 2023 03:27 PM2023-11-08T15:27:36+5:302023-11-08T15:28:16+5:30
शाहरुख खानच्या 'डंकी' या चित्रपटाची सर्वजण आतुरतेने वाट पाहात आहेत.
बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानचा आगामी चित्रपट 'डंकी' गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे. या चित्रपटाची सर्वजण आतुरतेने वाट पाहात आहेत. २ नोव्हेंबर रोजी शाहरुखच्या वाढदिवशी 'डंकी' चित्रपटाचा टीझर शेअर करण्यात आला होता. तो पाहून चाहत्यांमध्ये उत्सुकता शिगेला पोहोचली. काहींनी चित्रपटाच्या टीझरचे कौतुक केले. तर काहींना हा चित्रपट दाक्षिणात्य चित्रपटाचा रिमेक असल्याचं म्हटलं आहे. तर खरेच असे आहे का हे सविस्तर जाणून घेऊया.
एका दाक्षिणात्य चित्रपटाचा 'डंकी' हा रिमेक आहे, असा काही जण दावा करत आहेत. पण, तसे नसून डंकी हा कुठल्याही चित्रपटाचा रिमेक नसल्याचे समोर आले आहे. 'डंकी'ची कथा बेकायदेशीरपणे लंडनला जाण्यावर आधारित आहे. चार मित्र ज्यांना लंडनला जायचं असतं मात्र अनेक अडचणी येत असतात. शाहरुख खान या मित्रांना लंडनला पाठवण्यासाठी धडपडत असतो. या चार मित्रांमध्ये तापसी पन्नू आणि विकी कौशल यांचा समावेश आहे.
'डंकी' या सिनेमाची निर्मिती रेड चिलीज एंटरटेनमेंट आणि जियो स्टुडीओच्या बॅनरअंतर्गत करण्यात आली आहे. राजकुमार हिरानींच्या या सिनेमात शाहरुख पहिल्यांदाच झळकणार आहे. शाहरुख खान चार वर्षे सिनेसृष्टीपासून दूर होता. त्यानंतर 'पठाण' मधून त्याने जोरदार कमबॅक केलं. त्यानंतर त्याचा 'जवान' हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला आला. या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर रेकॉर्डब्रेक कमाई केली. आता आता त्याचा 'डंकी' हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीसाठी सज्ज आहे. या सिनेमासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत. हा सिनेमाही हिट झाला तर यावर्षातला हा शाहरुखचा सलग तिसरा सुपरडुपर हिट सिनेमा ठरणार आहे.