'पठाण'च्या कॉन्ट्रोव्हर्सीवर शाहरुख खानची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला- 'आम्ही प्रत्येक धर्मासाठी...'

By ऑनलाइन लोकमत | Published: January 30, 2023 08:14 PM2023-01-30T20:14:46+5:302023-01-30T20:15:12+5:30

Pathaan : पठाण चित्रपटाला चाहत्यांकडून मिळालेल्या अफाट प्रेमाने किंग खान भारावून गेला आहे आणि पहिल्यांदाच पठाण चित्रपटाच्या टीमने मीडियाशी संवाद साधला.

Shahrukh Khan's first reaction to 'Pathan' controversy, says- 'We are for every religion...' | 'पठाण'च्या कॉन्ट्रोव्हर्सीवर शाहरुख खानची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला- 'आम्ही प्रत्येक धर्मासाठी...'

'पठाण'च्या कॉन्ट्रोव्हर्सीवर शाहरुख खानची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला- 'आम्ही प्रत्येक धर्मासाठी...'

googlenewsNext

शाहरुख खानचा (Shah Rukh Khan) 'पठाण' (Pathaan) हा चित्रपटात जगभरात प्रदर्शित झाला आणि प्रदर्शित होताच या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला आहे. खरेतर या चित्रपटाला सुरुवातीपासून कॉन्ट्रोव्हसीमध्ये अडकला होता. पठाणला विरोधाचा किंवा बॉयकॉट ट्रेंडचा काहीच परिणाम झालेला नाही. याउलट चित्रपट बॉक्सऑफिसवर चांगला व्यवसाय करत आहे. भारतात आतापर्यंत सिनेमाने २०० कोटींचा टप्पा ओलांडला आहे तर जगभरात पठाणने ४०० कोटींचा टप्पा पार केला आहे. पठाण चित्रपटाला चाहत्यांकडून मिळालेल्या अफाट प्रेमाने किंग खान भारावून गेला आहे आणि पहिल्यांदाच पठाण चित्रपटाच्या टीमने मीडियाशी संवाद साधला. यावेळी चित्रपटाचे टीमने प्रेक्षकांचे आभार मानले. यावेळी शाहरुख खानने चित्रपटाच्या कॉन्ट्रोव्हर्सीवरदेखील प्रतिक्रिया दिली.

पठाण चित्रपटाचे नाव आणि 'बेशरम रंग' या गाण्यावरून देशातून विरोध झाला होता. मात्र संपूर्ण स्टारकास्टने यावर कधीच कोणतेच स्टेटमेंट दिले नाही. आजही शाहरुख खानने कोणाचेही नाव घेतले नाही तर आपले म्हणणे मांडले. तो प्रत्येक धर्मासाठी सिनेमा बनवतो असेही शाहरुख म्हणाला. तो म्हणाला, “मी सांगू इच्छितो की, कोणीही चित्रपट बनवतो, मग तो कोणत्याही भाषेत बनवला जात असला, तरी आपल्या पात्रांनी लोकांना खूश करणे हाच सर्वांचा उद्देश असतो. कोणाच्याही भावना दुखावण्याचा आमचा उद्देश नाही. आम्ही अमर (दीपिका), अकबर (शाहरुख), अँथोनी (जॉन) आहोत, आम्ही प्रत्येक वर्गाच्या, समाजाच्या, धर्माच्या लोकांसाठी प्रेम आणि आनंद पसरवण्यासाठी चित्रपट बनवतो, हाच 'पठाण'चा अर्थ आहे.


पठाणचे प्रमोशन का केले नाही, यावर अभिनेता म्हणाला की, "आम्ही तिन्ही मीडियाला भेटलो नाही. कोविड-19 दरम्यान आम्ही (पठाण) शूट केले. आम्ही खूप मेहनत केली. त्यामुळे आम्ही कामाच्या मूडमध्ये होतो. या सर्व गोष्टी असूनही, चित्रपटाला पाठिंबा मिळाला. खूप खूप. धन्यवाद. चित्रपटाला मिळालेले प्रेम पाहून वादाचे दु:ख कमी झाले आहे."

Web Title: Shahrukh Khan's first reaction to 'Pathan' controversy, says- 'We are for every religion...'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.