शाहरुखचा चित्रपट रिलीजआधीच वादाच्या भोवऱ्यात? कहाणी चोरल्याचा आरोप
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 5, 2022 18:48 IST2022-11-05T18:47:08+5:302022-11-05T18:48:40+5:30
सिनेमाचा ट्रेलर तर प्रेक्षकांना खूप आवडलाय. पठाण नंतर शाहरुखच्या चाहत्यांना आणखी एका चित्रपटाची प्रतिक्षा आहे तो म्हणजे जवान.

शाहरुखचा चित्रपट रिलीजआधीच वादाच्या भोवऱ्यात? कहाणी चोरल्याचा आरोप
बॉलिवूडचा बादशाह शाहरुख खान पठाण मधून बऱ्याच काळानंतर चाहत्यांसमोर येतोय. सिनेमाचा ट्रेलर तर प्रेक्षकांना खूप आवडलाय. पठाण नंतर शाहरुखच्या चाहत्यांना आणखी एका चित्रपटाची प्रतिक्षा आहे तो म्हणजे 'जवान'. जवानचे अजुन चित्रीकरण सुरु आहे. मात्र त्याआधीच सिनेमा वादात अडकलाय. जवान हा सिनेमा तमिळ फिल्म 'पेरारासु' ची कॉपी असल्याचा आरोप निर्माता मणिकम नारायणन यांनी केलाय. मणिकम यांनी जवान चित्रपटाचे निर्माता एटली यांच्याविरोधात तमिळ फिल्म प्रोड्युसर्स काउंसिल मध्ये तक्रार दाखल केली आहे.
विजयकांत यांची प्रमुख भुमिका असलेला पेरारासु हा सिनेमा २००६ मध्ये आला होता. पेरारासु ची कहाणी चोरल्याचा आरोप मणिकम यांनी केला आहे. तमिळ फिल्म प्रोड्युसर्स काउंसिल बोर्ड सदस्य ७ नोव्हेंबर रोजी याप्रकरणी चौकशी करणार आहेत. मणिकम यांच्याकडे पेरारासुचे राईट्स असल्याचीही माहिती मिळत आहे.
जवान हा सिनेमा पुढील वर्षी जून महिन्यात प्रदर्शित होणार आहे. सध्या सिनेमाचे शुटिंग सुरु आहे. निर्माता एटली यांचा जवान हा पहिलाच बॉलिवूड सिनेमा असणार आहे. तर शाहरुख खानसोबत अभिनेत्री नयनताराची जोडी बघायला मिळणार आहे. तसेच विजय सेतुपती आणि दीपिका पदुकोणचा कॅमिओ असल्याची चर्चा आहे.