किंग खान शाहरूखचा मुलगा करणार बॉलिवूडमध्ये एन्ट्री, झळकणार बाहुबली फेम प्रभाससोबत
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 23, 2019 17:05 IST2019-07-23T17:02:22+5:302019-07-23T17:05:08+5:30
यावर्षी अनेक स्टार किड्सनी बॉलिवूडमध्ये डेब्यू केला. अनन्या पांडे, सारा अली खान आणि प्रनूतन यासारख्या अनेक स्टार किड्सच्या मुलांनी बॉलिवूडमध्ये पदार्पण केले.

किंग खान शाहरूखचा मुलगा करणार बॉलिवूडमध्ये एन्ट्री, झळकणार बाहुबली फेम प्रभाससोबत
यावर्षी अनेक स्टार किड्सनी बॉलिवूडमध्ये डेब्यू केला. अनन्या पांडे, सारा अली खान आणि प्रनूतन यासारख्या अनेक स्टार किड्सच्या मुलांनी पदार्पण केले. मात्र यासगळ्यात बॉलिवूडचा किंग खान अर्थात शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान बी-टाऊनमध्ये कधी पदार्पण करणार याची वाट त्याचे फॅन्स मोठ्या आतुरतेने करत होते. नुकताच आर्यनने 'द लॉयन किंग' सिनेमातील सिम्बाच्या भूमिकेला आपला आवाज दिला आहे.
नवभारत टाईम्सच्या रिपोर्टनुसार, आर्यनला करण जोहर लॉन्च करणार आहे. आर्यन साऊथच्या सिनेमातून आपल्या करिअरची सुरुवात करणार आहे. दिग्दर्शक गुनाशेखर 'हिरण्यकश्यपु' नावाचा सिनेमा तयार करत आहेत जो 'बाहुबली'सारखाच विशाल असेल. या सिनेमासाठी आर्यन खानच्या नावाचा विचार सुरु आहे. मिळालेल्या माहितीनुसार यात प्रभास आणि राणा दग्गुबातीसुद्धा दिसणार आहेत.
आर्यन लंडनमध्ये राहणाऱ्या एका ब्लॉगरला डेट करतो असल्याची चर्चा रंगली होती. या मुलीला गौरी खानदेखील भेटली असून तिला देखील आर्यनची पसंती आवडली आहे आणि ती खूप खूश आहे. सध्या शाहरूख मुलांसोबत मालदीवमध्ये सुट्ट्या व्यतित करत आहे.