वन पीस ड्रेसमुळे शाहरूख खानची लाडकी लेक सुहानावर यूजर्सची सडकून टीका!
By ऑनलाइन लोकमत | Published: December 29, 2017 12:07 PM2017-12-29T12:07:19+5:302017-12-29T17:37:26+5:30
शाहरूख खानची लाडकी लेक सुहाना खान पुन्हा एकदा तिच्या ड्रेसमुळे ट्रोल होत आहे. तिच्यावर यूजर्सकडून सातत्याने टीका केल्या जात आहेत.
ब लिवूडचा किंग शाहरूख खान याची लाडकी लेक सुहाना ही तिच्या एका फोटोवरून सध्या सोशल मीडियावर ट्रोल होत आहे. तिचा हा फोटो मम्मी गौरी खान हिने तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर शेअर केला होता. मात्र फोटोमध्ये सुहानाने परिधान केलेल्या ड्रेसवरून सध्या ती यूजर्सच्या निशाण्यावर आली आहे. फोटोमध्ये सुहानाने वन पीस ड्रेस घातला आहे. ज्यामध्ये तिच्या शरीराचा वरचा भाग आणि पाय उघडे दिसत आहेत. हीच बाब यूजर्सला पसंत आली नसल्याने त्यांच्याकडून सातत्याने सुहानाला ट्रोल केले जात आहे. एका यूजर्सने लिहिले की, ‘सुहाना तुला मुस्लीम म्हणण्याचा काहीही अधिकार नाही. एका मुस्लीम मुलीला नेहमीच तिचे संपूर्ण शरीर झाकायला हवे. सुहाना खूपच लवकर मोठी होण्याचा प्रयत्न करीत आहे. जरा थांब मुली!’
तर ट्विटरवर शाहरूखच्या एका चाहत्याने लिहिले की, ‘ती अजून पूर्णत: तयार झाली नाही आणि ती अजिबातच डिसेंट वाटत नाही. तिने अशाप्रकारचे कपडे न घालताही ती चांगली अभिनेत्री होऊ शकते. मला माहिती आहे की, ती नेहमीच अशाप्रकारे तयार झाली आहे, परंतु ती एक मुलगी आहे त्यामुळे लोक त्यास जज करणारच!’ यूजर्सच्या या कॉमेण्टलाही काही नेटिझन्सनी विरोध केला. एकीकडे शाहरूखचे काही चाहते सुहानाच्या या फोटोचे समर्थन करीत होते, तर काही चाहते तिचा विरोध करताना दिसले.
वास्तविक सुहाना नेहमीच तिच्या ड्रेसमुळे चर्चेत असते. गेल्या काहीकाळापासून तर ती प्रचंड लाइमलाइटमध्ये राहत आहे. सुहाना सध्या लंडन येथे शिक्षण घेत असून, काही दिवसांपूर्वीच ती मम्मी गौरी खानसोबत दिल्लीतील एका रेस्टॉरंट येथे बघावयास मिळाली होती. यावेळी सुहानाचा अंदाज बघण्यासारखा होता. परंतु इंटरनेटवर काही नेटिझन्सना तिची वेशभूषा अजिबातच पसंत न आल्याने तिच्यावर सातत्याने टीका केली जात आहे. आता शाहरूख या सर्व प्रकरणाकडे लक्ष देणार की दुर्लक्ष करणार हे बघणे महत्त्वाचे ठरेल.