Guari khanनं करण जोहरच्या घराचा केला कायापालट, चित्रपट निर्मात्याने मेकओव्हरची दाखवली पहिली झलक

By ऑनलाइन लोकमत | Published: December 22, 2022 12:26 PM2022-12-22T12:26:33+5:302022-12-22T12:28:52+5:30

गौरीने अनेक बॉलिवूड सेलिब्रेटींच्या घराचा मेकओव्हर केला आहे. आता या यादीत करण जोहरचे नावही सामील झालं आहे

Shahrukh khans wife Gauri khan does makeover of Karan Johars home check out video | Guari khanनं करण जोहरच्या घराचा केला कायापालट, चित्रपट निर्मात्याने मेकओव्हरची दाखवली पहिली झलक

Guari khanनं करण जोहरच्या घराचा केला कायापालट, चित्रपट निर्मात्याने मेकओव्हरची दाखवली पहिली झलक

googlenewsNext

Gauri Khan renovates Karan Johar's home: बॉलिवूड सुपरस्टार शाहरुख खान (Shah Rukh Khan)ची पत्नी गौरी खान आज कोणत्याही परिचयाची गरज नाही. सुपरस्टार शाहरुख खानची पत्नी गौरी खान ही एक प्रसिद्ध इंटिरियर डिझायनर आहे. गौरीने अनेक बॉलिवूड सेलिब्रेटींच्या घराचा मेकओव्हर केला आहे. आता या यादीत करण जोहरचे नावही सामील झालं आहे. शाहरुख खानचा जवळचा मित्र प्रसिद्ध चित्रपट निर्माता करण जोहरने ही अलीकडेच गौरी खान आपलं घरं रिनोव्हेट करुन घेतलं आहे. ज्याची झलक आता चित्रपट निर्मात्याने त्याच्या सोशल मीडिया हँडलवरून शेअर केली आहे. करण जोहरने इंस्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर करून चाहत्यांना त्याच्या नव्या घराची झलक दिली. तसेच गौरी खानने स्वतः हा सुंदर व्हिडिओ तिच्या इंस्टाग्रामवर शेअर केला आहे.

हा व्हिडिओ शेअर करताना गौरी खानने कमेंट करत लिहिले, 'सर्वात आवडत्या प्रोजेक्टपैकी एक...  खुद्द करण जोहरही गौरी खानच्या या पोस्टवर कमेंट केल्याशिवाय राहू शकला नाही. चित्रपट निर्माता करण जोहर म्हणाला, 'माझे घर आता तुझं देखील आहे.. तुला खूप सारं प्रेम.. 

गौरी खानने याआधीही करण जोहरच्या घराचे नूतनीकरण केलं आहे. इतकेच नाही तर गौरी खाननं आलिया भट, सिद्धार्थ मल्होत्रा, जॅकलिन फर्नांडिस आणि ट्विंकल खन्ना यांच्यासह अनेक स्टार्सच्या घराचे रिनोव्हेशन केलं आहे. काही दिवसांपूर्वीच गौरी खानने तिच्या घराची मन्नतची नेमप्लेट पुन्हा डिझाइन केली होती. ज्यांचे फोटो खूप व्हायरल झाले होते.

Web Title: Shahrukh khans wife Gauri khan does makeover of Karan Johars home check out video

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.