बॉक्स ऑफिसवर निर्माण झालीये का R.माधवनची दहशत?; जाणून घ्या 'शैतान'चं फर्स्ट डे कलेक्शन
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 9, 2024 13:34 IST2024-03-09T13:33:58+5:302024-03-09T13:34:41+5:30
Shaitaan box office collection: हा सिनेमा रिलीज होण्यापूर्वीच प्रेक्षकांनी अॅडव्हान्स बुकिंग करायला सुरुवात केली होती.

बॉक्स ऑफिसवर निर्माण झालीये का R.माधवनची दहशत?; जाणून घ्या 'शैतान'चं फर्स्ट डे कलेक्शन
अजय देवगण (ajay devgn), आर. माधवन (r. madhavan) आणि साऊथ स्टार ज्योतिका (jyotika) यांचा शैतान हा सिनेमा नुकताच रिलीज झाला. हॉरर ड्रामा असलेल्या या सिनेमाचा ट्रेलर तुफान गाजला होता. त्यामुळे या सिनेमाची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत होते. इतकंच नाही तर प्रेक्षकांन अॅडव्हान्स बुकिंग सुद्धा केलं होतं. विशेष म्हणजे हा सिनेमा रिलीज झाल्यानंतर तो बॉक्स ऑफिसवर चांगलाच चर्चेत आला आहे. देशासह विदेशातही त्याची चर्चा रंगली आहे. त्यामुळेच या सिनेमाने पहिल्या दिवशी किती कमाई केली ते पाहुयात.
'शैतान' हा सिनेमा वश या गुजराथी सिनेमाचा रिमेक आहे. या सिनेमाचा ट्रेलर आणि टीझर प्रचंड गाजला होता. त्यामुळे प्रेक्षक या सिनेमाची आतुरतेने वाट पाहत होते. त्यामुळे सिनेमा रिलीज झाल्यानंतर त्याने बॉक्स ऑफिसवर किती कोटींची कमाई केलीये ते पाहुयात.
मीडिया रिपोर्टनुसार, शैतान या सिनेमाने रिलीज होण्यापूर्वीच १.७६ लाखांपेक्षा जास्त कमाई केली होती. मात्र, हा सिनेमा रिलीज झाल्यानंतर त्याने पहिल्या दिवशी केवळ ८ ते १२ लाखांच्या आसपास कमाई केल्याचं म्हटलं जात आहे. अजय देवगणचा हा सिनेमा ६० ते ६५ कोटी रुपये खर्च करुन तयार करण्यात आल्याचं म्हटलं जात आहे. त्यामुळे हा सिनेमा आता नेमक्या किती कोटींची कमाई करतो याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे.
दरम्यान, ८ मार्च रोजी हा सिनेमा रिलीज झाला असून यात दाक्षिणात्य अभिनेत्री ज्योतिका, आर. माधवन आणि अजय देवगण महत्त्वपूर्ण भूमिकेत आहेत.