राक्षस घरी येणार आणि बस्तान मांडणार, आर.माधवन-अजय देवगणच्या 'शैतान'चा अंगावर काटा आणणारा ट्रेलर बघाच
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 22, 2024 13:15 IST2024-02-22T13:14:46+5:302024-02-22T13:15:24+5:30
अजय देवगण - आर. माधवन यांच्या 'शैतान'चा भयंकर ट्रेलर रिलीज झालाय. क्लिक करुन तुम्हीही बघा (Ajay Devgn, Jyotika, Shaitaan)

राक्षस घरी येणार आणि बस्तान मांडणार, आर.माधवन-अजय देवगणच्या 'शैतान'चा अंगावर काटा आणणारा ट्रेलर बघाच
गेल्या अनेक दिवसांपासून अजय देवगण - आर.माधवन (Ajay Devgn) यांच्या आगामी 'शैतान' (Shaitaan) सिनेमाची सर्वांना उत्सुकता होती. 'शैतान' सिनेमाचं पोस्टर आणि टिझर पाहूनच प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला होती. खुप दिवसांनी बॉलिवूडमध्ये एक तगडा हॉरर सिनेमा पाहायला मिळणार, अशी प्रत्येकाची भावना आहे. अशातच 'शैतान' चा ट्रेलर नुकताच रिलीज झालाय. अंगावर काटा आणणाऱ्या ट्रेलरमध्ये अजय देवगण - आर. माधवनचा भयंकर अंदाज बघायला मिळतोय.
ट्रेलरमध्ये बघायला मिळतं अजय देवगण त्याची मुलगी आणि बायकोसोबत एका आलिशान घरात राहत असतो. अशातच एक अनोळखी माणूस त्यांच्या घरी येतो. आणि तो अजयच्या मुलीवर जादूटोणा करतो. पुढे माधवन जे भयंकर कृत्य सांगेल त्या कृत्यांचं पालन ती मुलगी करते. त्यामुळे सर्वांच्या मनात घबराट होते. अजय माधवनवर प्रचंड संतापतो. माधवन नक्की कोण असतो? तो खरंच राक्षस असतो का? याची उत्तरं 'शैतान' पाहूनच मिळतील.
जिओ स्टुडिओ, देवगण फिल्म्स आणि पॅनोरमा स्टुडिओज प्रस्तुत, 'शैतान'ची निर्मिती अजय देवगण, ज्योती देशपांडे, कुमार मंगत पाठक आणि अभिषेक पाठक यांनी केली आहे. हा सिनेमा विकास बहल यांनी दिग्दर्शित आहे. सिनेमात अजय देवगण, माधवन, ज्योतिका प्रमुख भूमिकेत आहेत. 8 मार्च 2024 रोजी हा सिनेमा थिएटरमध्ये रिलीज होणार आहे.