शकीला बायोपिकचे नवे पोस्टर रिलीज

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 2, 2019 21:00 IST2019-01-02T21:00:00+5:302019-01-02T21:00:00+5:30

साऊथच्या एडल्ट चित्रपटांची अभिनेत्री शकीला हिच्या जीवनावर आधारीत हा बायोपिक असून यात तिच्या भूमिकेत अभिनेत्री रिचा चड्ढा दिसणार आहे.

Shakeela Biopic's new poster release | शकीला बायोपिकचे नवे पोस्टर रिलीज

शकीला बायोपिकचे नवे पोस्टर रिलीज

ठळक मुद्देशकीला बायोपिकमध्ये मुख्य भूमिकेत रिचा चड्ढा

शकीला बायोपिकची प्रेक्षक उत्सुकतेने वाट पाहत आहेत. साऊथच्या एडल्ट चित्रपटांची अभिनेत्री शकीला हिच्या जीवनावर आधारीत हा बायोपिक असून यात तिच्या भूमिकेत अभिनेत्री रिचा चड्ढा दिसणार आहे. या बायोपिकचे दिग्दर्शन इंद्रजीत लंकेश करत आहेत. या चित्रपटाचा आणखीन एक पोस्टर नुकताच लाँच करण्यात आला आहे.


शकीला बायोपिकच्या निर्मात्यांनी नवीन वर्षाच्या सुरूवातीला अनोखे पोस्टर प्रदर्शित केले आहे. या पोस्टरमध्ये दारूच्या ग्लासात डुबलेली शकीला सर्वांना शुभेच्छा देत आहे की इस साल का जाम, शकीला के नाम. हा पोस्टर पाहिल्यानंतर प्रेक्षक या चित्रपटाबाबत खूप उत्साही झाले आहेत. 
शकीलाची भूमिका साकारताना आलेल्या अनुभवांबद्दल रिचाने सांगितले की, मी शकीला बायोपिकमध्ये काम करताना खूप एन्जॉय केले आहे. हा सिनेमा मी आतापर्यंत केलेल्या सिनेमांपेक्षा वेगळा आहे. त्यांच्या जीवनात आलेले चढउतार सिनेमामध्ये पाहायला मिळणार आहेत. ज्या गोष्टी सांगायच्या आहेत, त्या सर्व गोष्टींचा समावेश सिनेमात करण्यात आला आहे. सर्व गोष्टी लपवून चित्रपट बनवण्यात काय अर्थ आहे. या चित्रपटात शकीला देखील दिसणार आहेत. त्या केमिओ करणार आहेत. दिग्दर्शक लंकेशने नंतर शकीला यांना चित्रपटात घेण्याचा निर्णय घेतला. 


शकीला केरळच्या असून त्यांनी तमीळ, तेलगू, मल्याळम व कन्नड यांसारख्या भाषेतील बी-ग्रेड चित्रपटांमध्ये काम केले आहे. शकीला यांच्या बायोपिकमध्ये त्यांनी सिनेइंडस्ट्रीत करियरला सुरूवात केल्यापासून आतापर्यंतचा प्रवास पाहायला मिळणार आहे. एका मुलाखतीत शकीलाने सांगितले की, त्यांना सहा भाऊ-बहिण आहेत. कुटुंबाची आर्थिक स्थिती पाहून तिच्या आई वडिलांनी कुटुंबाची जबाबदारी शकीलावर टाकली. वयाच्या बावीस-तेवीसाव्या वर्षी शकीलाने चित्रपटसृष्टीत पाऊल टाकले. पहिला चित्रपट प्लेगर्ल्समध्ये त्यांनी सिल्क स्मिताच्या बहिणीची भूमिका केली होती.एक काळ असा आला त्यावेळी त्या खूप लोकप्रिय झाल्या होत्या. साऊथचे निर्माते त्यांच्यावर अवलंबून होते. निर्मात्यांचा शकीलावर खूप विश्वास होता.

Web Title: Shakeela Biopic's new poster release

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.