"माझ्याशी लग्न कर आणि हाऊसवाइफ हो", शक्ती कपूर यांनी १२ वर्षांनी लहान बायकोला सोडायला लावलं करिअर
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 15, 2025 13:57 IST2025-01-15T13:56:45+5:302025-01-15T13:57:15+5:30
शक्ती कपूर यांची पत्नी शिवांगी कोल्हापुरे यादेखील अभिनय क्षेत्रात कार्यरत होत्या. मात्र लग्नानंतर शक्ती कपूर यांनी त्यांना कलाविश्व सोडून हाऊसवाईफ होण्यास सांगितलं. नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत शक्ती कपूर यांनी हा खुलासा केला आहे.

"माझ्याशी लग्न कर आणि हाऊसवाइफ हो", शक्ती कपूर यांनी १२ वर्षांनी लहान बायकोला सोडायला लावलं करिअर
बॉलिवूडचा पॉप्युलर व्हिलन म्हटलं की शक्ती कपूर डोळ्यासमोर येतात. अनेक सुपरहिट सिनेमांमध्ये व्हिलन साकारून त्यांनी प्रेक्षकांची मनं जिंकली. वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवत श्रद्धा कपूरही बॉलिवूड गाजवत आहे. शक्ती कपूर यांची पत्नी शिवांगी कोल्हापुरे यादेखील अभिनय क्षेत्रात कार्यरत होत्या. मात्र लग्नानंतर शक्ती कपूर यांनी त्यांना कलाविश्व सोडून हाऊसवाईफ होण्यास सांगितलं. नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत शक्ती कपूर यांनी हा खुलासा केला आहे.
शक्ती कपूर यांनी नुकतीच 'टाइमआऊट विथ अंकित' या पॉडकास्टला हजेरी लावली. या मुलाखतीत त्यांनी शिवांगी कोल्हापुरे यांच्यासोबत त्यांची लव्हस्टोरी सांगितली. त्याबरोबरच अनेक गोष्टींचाही खुलासा केला. ते म्हणाले, "ती बालकलाकार असताना तिला भेटलो होतो. सिनेमात मी एक वृद्ध व्यक्तीची भूमिका साकारत होतो. ती माझ्यापेक्षा १२ वर्षांनी लहान आहे. आम्ही भेटलो आणि एकमेकांच्या प्रेमात पडलो. मला इतकी संस्कारी आणि सुंदर मुलगी कुठे भेटली असती".
"एक दिवस मी तिला म्हणालो की माझं कामात लक्ष लागत नाहीये. त्यामुळे मला लक्ष केंद्रित करण्याची गरज आहे. तेव्हा तिला राग आला. मी तिच्याकडे गेलो आणि तिला म्हणालो की मला तुझ्याशी लग्न करायचं आहे. पण, मला वाटतं की तू हाऊसवाइफ व्हावं. तिने माझ्यासाठी तिचं करिअर सोडलं. या गोष्टीसाठी मी आजही हात जोडून तिचे आभार मानतो", असं शक्ती कपूर म्हणाले.
शक्ती कपूर आणि शिवांनी कोल्हापुरे यांनी १९८२ साली लग्न केलं होतं. शिवांगी कोल्हापुरे या एक अभिनेत्री आणि गायिका होत्या. लोकप्रिय अभिनेत्री पद्मिनी कोल्हापुरे यांच्या त्या बहीण आहेत. शक्ती कपूर आणि शिवांगी यांना श्रद्धा आणि सिद्धांत ही दोन मुले आहेत.