Teaser : शक्तिमान आता मोठ्या पडद्यावर करणार धमाका, 'भारतातले सुपरस्टार' दिसणार सुपरहिरोच्या अवतारात
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 11, 2022 11:10 IST2022-02-11T11:02:51+5:302022-02-11T11:10:09+5:30
शक्तिमानचा चित्रपटचा धमाकेदार टीझर रिलीज झाला आहे.

Teaser : शक्तिमान आता मोठ्या पडद्यावर करणार धमाका, 'भारतातले सुपरस्टार' दिसणार सुपरहिरोच्या अवतारात
भारतीय प्रेक्षक अनेक वर्षांपासून सुपरहिरो 'शक्तिमान' (Shaktimaan)ला मोठ्या पडद्यावर बघायाला कधीची वाट पाहत होते. शक्तीमान या चित्रपटाबाबत याआधी अनेक बातम्या समोर आल्या होत्या, मात्र निश्चितपणे काहीही सांगितले जात नव्हते, मात्र सोनी पिक्चर्स इंटरनॅशनल प्रॉडक्शनने चाहत्यांना एक मोठी भेट दिली आहे. शक्तीमानचा चित्रपट बनत असून त्याचा धमाकेदार टीझर रिलीज झाला आहे.
शक्तिमानचा टिझर व्हायरल
सोनी पिक्चर्स इंडियाच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवरून एक व्हिडिओ पोस्ट करण्यात आला आहे. शक्तिमान या आगामी चित्रपटाची झलक या व्हिडिओमध्ये दाखवण्यात आली आहे. प्रोमो पाहता, हे स्पष्ट होते की मुकेश खन्ना स्टारर शक्तिमान टीव्ही शोप्रमाणे या चित्रपटातही शक्तिमान पत्रकाराच्या भूमिकेत दिसणार आहे. रिपोर्ट्सनुसार, या चित्रपटात भारताचे सुपरस्टार दिसणार आहेत.
या टीझरबद्दल बोलायचे झाले तर, व्हिडिओमध्ये एक मोठा उल्का पृथ्वीच्या दिशेने सरकत असल्याचे दिसत आहे. त्याचवेळी काळ्या रंगाच्या पोशाखात एक माणूस हवेत उडताना दिसत आहे. यानंतर शक्तीमानची एक झलक दिसली, ज्यामध्ये त्याच्या ड्रेससह चष्मा आणि कॅमेरा दिसत आहे. सोनीने आपल्या ट्विटमध्ये लिहिले की, 'भारतात आणि जगभरातील अनेक सुपरहिरोच्या यशानंतर आता आपल्या देसी सुपरहिरोची वेळ आली आहे.'
मुकेश खन्ना झाले होते शक्तीमान
1997 ते 2000 पर्यंत शक्तीमान दूरदर्शनवर आपल्या भेटीला यायचा. मुकेश खन्ना शक्तीमानची भूमिका साकारत होते. या शोमध्ये मुकेश खन्ना यांनी पंडित विद्याधर मायाधर ओंकारनाथ शास्त्री यांचीही भूमिका साकारली होती, जे पत्रकार होते. यासोबतच वैष्णव महंत यांनी गीता विश्वास यांची तर सुरेंद्र पाल यांनी तामराज किलविशची भूमिका साकारली होती.