महादेवाच्या भक्तीत तल्लीन झाला खिलाडी कुमार; अक्षयच्या आवाजातले 'शंभू' हे गाणं ऐकलं का?

By ऑनलाइन लोकमत | Published: February 5, 2024 12:20 PM2024-02-05T12:20:26+5:302024-02-05T12:21:47+5:30

आपल्या प्रतिभेच्या जोरावर या अभिनेत्याने एक वेगळी ओळख निर्माण केली आहे.  

Shambhu Song: Akshay Kumar Is A Shiv Bhakt In The New Devotional Track | महादेवाच्या भक्तीत तल्लीन झाला खिलाडी कुमार; अक्षयच्या आवाजातले 'शंभू' हे गाणं ऐकलं का?

महादेवाच्या भक्तीत तल्लीन झाला खिलाडी कुमार; अक्षयच्या आवाजातले 'शंभू' हे गाणं ऐकलं का?

 बॉलिवूडचा ‘खिलाडी’ अर्थात अभिनेता अक्षय कुमार हा चित्रपटसृष्टीतील उत्कृष्ट अभिनेत्यांपैकी एक आहे. आपल्या प्रतिभेच्या जोरावर या अभिनेत्याने एक वेगळी ओळख निर्माण केली आहे.  लाखो चाहत्यांच्या मनावर तो राज्य करतो. अभिनयानंतर आता खिलाडी कुमारने आता गायनात हात आजमावला आहे.   'OMG 2' मध्ये शिवभक्ताची भूमिका साकारल्यानंतर आता अक्षयच्या आवाजातले 'शंभू' हे गाणे प्रेक्षकांच्या भेटीला आले आहे. 

अक्षय कुमारचं 'शंभू' हे गाणे आज रिलीज झालं आहे. या गाण्यात आपला आवाज देण्याबरोबरच अभिनेता शानदार नृत्य करताना दिसत आहे. गणेश आचार्य यांनी या गाण्याचे दिग्दर्शन केले तर विक्रम मॉन्ट्रोज यांनी संगीतबद्ध केले आहे. हे गाणे अक्षय कुमारसह सुधीर यदुवंशी आणि विक्रम मॉन्ट्रोजने गायले आहे. तर  गाण्याचे बोल अभिनव शेखर यांनी लिहिले आहे. 'शंभू' हे गाणे रिलीज होताच सोशल मीडियावर लोकप्रिय झाले आहे.  या गाण्याला चाहत्यांनी भरभरुन प्रेम दिलं. तर नेटकऱ्यांनी 'हर हर महादेव' अशा कमेंट केल्या आहेत.

अक्षय कुमारने पहिल्यांदाच स्वत:च्या आवाजात गाणे गायलेले नाही. या आधीही अक्षय कुमारने अनेक गाण्यांना आवाज दिला होता. अक्षयने टशन चित्रपटात एक गाणेही गायले आहे. त्यानंतर अभिनेत्याने स्पेशल 26 मध्ये 'मुझ में तू' हे गाणे गायले. स्पेशल 26 चे हे गाणे खूप लोकप्रिय झाले होते. अक्षयच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाल्यास, त्याचा काही दिवसांपुर्वी 'मिशन राणीगंज' सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. तर आता लवरकरच त्याच 'बडे मियाँ छोटे मियाँ' प्रदर्शित होणार आहे. 
 

Web Title: Shambhu Song: Akshay Kumar Is A Shiv Bhakt In The New Devotional Track

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.