उदय चोप्राला KISS करणं शमिता शेट्टीला पडलं होतं महागात, या व्यक्तीनं धरला होता अबोला
By ऑनलाइन लोकमत | Published: February 22, 2023 12:58 PM2023-02-22T12:58:14+5:302023-02-22T12:59:56+5:30
Shamita Shetty : शमिता शेट्टीने आपल्या करिअरची सुरुवात 'मोहबत्तें' चित्रपटातून केली होती.
शमिता शेट्टी (Shamita Shetty) ही अशी अभिनेत्री आहे जी चित्रपटांपासून दूर आहे, पण तिने आपल्या करिअरची सुरुवात मोहबत्ते चित्रपटातून केली होती. हा चित्रपट आजही प्रेक्षकांना पाहायला आवडतो. शमिता तिची बहीण शिल्पा शेट्टीप्रमाणे बॉलिवूड इंडस्ट्रीत नाव कमवू शकली नाही, पण बिग बॉस या रिअॅलिटी शोनंतर ती पुन्हा एकदा प्रसिद्धीच्या झोतात आली. तिने २००० साली 'मोहब्बतें' चित्रपटातून बॉलिवूडमध्ये एन्ट्री केली. या चित्रपटात शमिता व्यतिरिक्त बॉलिवूडचा किंग खान म्हणजेच शाहरुख खान, अमिताभ बच्चन, उदय चोप्रा यांच्यासह अनेक दिग्गज कलाकार होते. या चित्रपटात तिने अशी चूक केली, ज्यानंतर एका व्यक्तीने तिच्याशी बोलणे बंद केले.
शमिता शेट्टीने तिच्या डेब्यू चित्रपटात कोणती चूक केली? याचा खुलासा अभिनेत्रीने स्वतः केला असून त्यानंतर तिने अशी चूक पुन्हा केली नाही. शमिताने २००० साली आदित्य चोप्राच्या 'मोहब्बतें' या चित्रपटातून तिच्या सिझलिंग कॅरेक्टरने चित्रपटसृष्टीत पदार्पण केले. या चित्रपटात तिला उदय चोप्राला ऑन-स्क्रीन किस करणे कठीण झाले होते. चित्रपटातील एका दृश्यात केलेल्या चुंबनानंतर तिचे वडील शमिताशी महिनाभर बोलले नाही. याचा शमितावर इतका प्रभाव पडला की त्यानंतर तिने कधीही पडद्यावर किसिंग सीन केले नाहीत.
एका मुलाखतीदरम्यान, अभिनेत्रीने तिच्या आयुष्यातील अनेक मजेदार गोष्टींबद्दल सांगितले. शमिता म्हणाली, 'मी तो दिवस कधीही विसरू शकत नाही, जेव्हा माझ्या वडिलांनी किसिंग सीनमुळे माझ्याशी बोलणे बंद केले होते. एक-दोन दिवस नाही तर महिनाभर ते माझ्याशी बोलले नाहीत. वास्तविक, मी 'मोहब्बतें' चित्रपटात उदय चोप्राला किस केले होते. यामुळे माझे वडील खूप चिडले. मी माझ्या वडिलांच्या सर्वात जवळ होते आणि ते माझ्याशी न बोलल्यामुळे खूप दुःखी झाले. मात्र, महिनाभरानंतर वडिलांनी बोलायला सुरुवात केली, पण त्या सीनबद्दल कधीच चर्चा झाली नाही. जरी या चित्रपटानंतर हळूहळू एक टप्पा आला की ऑनस्क्रीन चुंबन खूप सामान्य झाले, परंतु माझ्या वडिलांच्या प्रतिक्रियेनंतर मी कोणत्याही चित्रपटात पडद्यावर कोणत्याही अभिनेत्यासोबत किसिंग सीन केले नाही.
शमिताने सांगितले की, चित्रपट साइन करताना तिने स्क्रिप्ट वाचली होती आणि कोणत्या स्क्रिप्टची गरज आहे हे पाहिले होते. यानंतरही मी काम केलेल्या सर्व चित्रपटांच्या स्क्रिप्ट पाहिल्या आणि पडद्यावर किस न करण्याचा निर्णय घेतला.