जेव्हा मधुबालाच्या सांगण्यावरून शम्मी कपूर पिऊ लागले होते बीअर, 'हे' होतं कारण....

By ऑनलाइन लोकमत | Published: August 14, 2020 10:39 AM2020-08-14T10:39:09+5:302020-08-14T10:49:11+5:30

१९४८ मध्ये शम्मी कपूर यांनी बालकलाकार म्हणून रूपेरी पडद्यावर एन्ट्री घेतली होती. त्यांना महिन्याला ५० रूपये पगार मिळत होता. पुढील चार वर्षे शम्मी कपूर त्यांच्या वडिलांसोबत पृथ्वी थिएटरजवळ राहिले होते.

Shammi Kapoor Death Anniversary : When Madhubala asked him put on weight | जेव्हा मधुबालाच्या सांगण्यावरून शम्मी कपूर पिऊ लागले होते बीअर, 'हे' होतं कारण....

जेव्हा मधुबालाच्या सांगण्यावरून शम्मी कपूर पिऊ लागले होते बीअर, 'हे' होतं कारण....

googlenewsNext

दिवंगत अभिनेते शम्मी कपूर हे त्यांच्या वेगळ्या अंदाजासाठी ओळखले जात होते. आपल्या वेगळ्या स्टाइलने त्यांनी बॉलिवूडमध्ये आपली वेगळी जागा निर्माण केली होती. त्यांच्यासारखी वेगळी आणि एनर्जेटिक स्टाइल पुन्हा कोणत्याही कलाकारात दिसली नाही. आज शम्मी कपूर यांची पुण्यतिथी. त्यांच्या जीवनाशी संबंधित एक किस्सा आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. १९४८ मध्ये शम्मी कपूर यांनी बालकलाकार म्हणून रूपेरी पडद्यावर एन्ट्री घेतली होती. त्यांना महिन्याला ५० रूपये पगार मिळत होता. पुढील चार वर्षे शम्मी कपूर त्यांच्या वडिलांसोबत पृथ्वी थिएटरजवळ राहिले होते.

सुरूवातीच्या दिवसांमध्ये शम्मी कपूर यांच वजन फार कमी होतं. त्यांचा सडपातळ बांधा पाहून अभिनेत्री मधुबाला या त्यांना म्हणाली की, तुमच्यासोबत काम करून मी तुमची हिरोईन असल्याचं वाटत नाही. मला वाटतं तुम्ही तुमचं वजन वाढवलं पाहिजे. शम्मी कपूर यांनी एका मुलाखतीत सांगितले होते की, 'मधुबालाने मला दिलेला सल्ला माझ्यासाठी फार महत्वाचा होता. म्हणून मी बीअर पिणं सुरू केलं होत. वजन लवकर वाढवण्याची हीच पद्धत मला सुचली होती'. शम्मी कपूर आणि मधुबाला यांनी बॉयफ्रेन्ड नावाच्या सिनेमात एकत्र काम केलं होतं.

शम्मी कपूर यांना सुरूवातीला फार लोकप्रियता मिळाली नाही. त्यांच्यासाठी 'तुमसा नही देखा' हा सिनेमा महत्वाचा ठरला. ते म्हणाले होते की, मला माहीत होतं की, जर हा सिनेमा चालला नाही तर माझं करिअर बुडणं निश्चित होतं. शम्मी कपूर यांनी या सिनेमासाठी लूक बदलला होता. क्लीन शेव्ह लूक, नवीन हेअरकट या सर्व गोष्टींचा फायदा झाला. हा सिनेमा हिट झाला आणि त्यांची वेगळी स्टाइल लोकप्रिय ठरली.

त्यांना हिंदी सिनेमातील एल्विस प्रेस्ली म्हटलं जातं. शम्मी कपूर यांनी 'तुमसा नहीं देखा', 'दिल देकर देखो', 'सिंगापुर', 'जंगली', 'कॉलेज गर्ल', 'प्रोफेसर', 'चाइना टाउन', 'प्यार किया तो डरना क्या', 'कश्मीर की कली', 'जानवर', 'तीसरी मंजिल', 'अंदाज' और 'सच्चाई' सारख्या सिनेमात काम केलं. १४ ऑगस्ट २०११ ला त्यांचं निधन झालं.

हे पण वाचा :

चक्क मधुबाला विरोधात दिलीप कुमार यांनी कोर्टात दिली होती साक्ष, याच कारणाने तुटलं होतं नातं...

रेखाच्या पहिल्या नवऱ्याची मुलगी आहे 'ही' अभिनेत्री, बोल्डनेसमुळे राहते नेहमी चर्चेत....

दीपिका पादुकोनसोबतच्या सिनेमासाठी प्रभास घेणार रेकॉर्ड ब्रेक मानधन, किती ते वाचून चक्रावून जाल...

Web Title: Shammi Kapoor Death Anniversary : When Madhubala asked him put on weight

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.