'मी माफी मागतो...', रणबीर कपूरचा शमशेरा फ्लॉप झाल्यावर दिग्दर्शकाची प्रतिक्रिया
By ऑनलाइन लोकमत | Published: July 28, 2022 12:25 PM2022-07-28T12:25:43+5:302022-07-28T12:29:03+5:30
Ranbir Kapoor : १५० करोडचं बजेट आणि तगडी स्टारकास्ट असूनही सिनेमा बॉक्सऑफिसवर आपली जादू दाखवू शकला नाही. रिलीज होईन चार दिवसांत या सिनेमाने आपला गाशा गुंडाळला आहे.
बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूर(Ranbir Kapoor) चा 'शमशेरा'(Shamshera) चित्रपट बॉक्स ऑफिसवर फारशी काही कमाल दाखवू शकला नाही. या चित्रपटाच्या माध्यमातून रणबीर कपूर चार वर्षांनंतर कमबॅक केलं. १५० करोडचं बजेट आणि तगडी स्टारकास्ट असूनही सिनेमा बॉक्सऑफिसवर आपली जादू दाखवू शकला नाही. रिलीज होईन चार दिवसांत या सिनेमाने आपला गाशा गुंडाळला आहे. रणबीरच्या शमशेराकडे प्रेक्षकांनी पाठ फिरवली हे पाहून दिग्दर्शकला दु:ख झालं आहे. त्याने सिनेमाने फ्लॉप ठरल्यानंतर सोशल मीडियावर एक भली मोठी पोस्ट लिहिली आहे.
करण मल्होत्राने आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर पोस्ट शेअर केली आहे. यात करणने लिहिले की, 'माझ्या प्रिय शमशेरा, तू जितका तेजस्वी आहेस. माझ्यासाठी या सोशल मीडियासारख्या प्लॅटफॉर्मवर व्यक्त होणे महत्त्वाचे आहे कारण इथेच तुमच्यासाठी प्रेम, द्वेष, उत्सव आणि अपमान मिळताना दिसते. मला गेल्या काही दिवसांपासून माफी मागायची आहे कारण मी द्वेष आणि राग सहन नाही करु शकलो. माझे पुनरागमन ही माझी कमजोरी होती आणि त्यासाठी कोणतेही कारण नाही.
त्यापुढे त्यांनी लिहिले, आता मी येथे आहे, तुमच्या शेजारी उभा आहे आणि तुम्ही माझे आहात याचा अभिमान आणि सन्मान वाटतो आहे. चांगले आणि वाईट अशा प्रत्येक गोष्टीला आपण एकत्रितपणे सामोरे जाऊ. समशेरा टीमला माझे प्रेम. आपल्याकडिल प्रेम, आशीर्वाद आणि काळजी हे सर्वात मौल्यवान आहे आणि ते कोणीही आपल्यापासून दूर करू शकत नाही. पुढे त्यांनी 'शमशेरा माझा आहे' असा हॅशटॅग लिहिला.
'शमशेरा' 22 जुलै रोजी थिएटरमध्ये रिलीज झाला होता. या चित्रपटात रणबीर कपूरसोबत वाणी कपूर आणि संजय दत्त यांच्याही प्रमुख भूमिका आहेत. त्याचबरोबर या चित्रपटात रणबीर कपूर पहिल्यांदाच दुहेरी भूमिकेत दिसत आहे. चित्रपटाच्या कलेक्शनबद्दल बोलायचे झाल्यास, रिपोर्ट्सनुसार, रणबीर कपूरच्या 'शमशेरा'ने रिलीजच्या पाचव्या दिवशी जवळपास 2.60 कोटी रुपयांचा व्यवसाय केला होता आणि आत्तापर्यंत हा चित्रपट केवळ 37.35 कोटी रुपये कमवू शकला आहे.