Shanaya Kapoor: सुहाना, खुशीनंतर शनाया कपूरचंही होणार पदार्पण; 'तू या मै'चा टीझर पाहिलात का?

By ऋचा वझे | Updated: March 12, 2025 11:03 IST2025-03-12T11:00:41+5:302025-03-12T11:03:12+5:30

Shanaya Kapoor debut: 'तू या मै' सिनेमाचा टीझर नुकतात आला आहे. जेन झी वाईब्स देणारा हा सिनेमा आहे.

shanaya kapoor debut movie tu yaa main teaser released starring adarsh gaurav in lead role | Shanaya Kapoor: सुहाना, खुशीनंतर शनाया कपूरचंही होणार पदार्पण; 'तू या मै'चा टीझर पाहिलात का?

Shanaya Kapoor: सुहाना, खुशीनंतर शनाया कपूरचंही होणार पदार्पण; 'तू या मै'चा टीझर पाहिलात का?

Shanaya Kapoor debut: सध्या एकानंतर एक स्टारकिड्स सिनेसृष्टीत पदार्पण करत आहेत. सुहाना खान, खुशी कपूर यांची एन्ट्री झाल्यानंतर आता शनाया कपूरचंही (Shanaya Kapoor) पदार्पण झालं आहे. शनाया ही अभिनेता संजय कपूरची मुलगी आणि अनिल कपूरची पुतणी आहे. अनन्या पांडे, सुहाना खान, शनाया एकदम जवळच्या मैत्रीणी आहेत. शनायाचा डेब्यू सिनेमा 'तू या मै' चा टीझर नुकताच रिलीज झाला आहे. विशेष म्हणजे नेटकऱ्यांनी शनायाला टीझर पाहूनच सुहाना आणि खुशीपेक्षा चांगली अभिनेत्री असं जाहीर केलं आहे. 

'तू या मै' सिनेमाचा टीझर नुकतात आला आहे. जेन झी वाईब्स देणारा हा सिनेमा आहे. तरुण मुलगा आणि मुलीची ही कहाणी आहे. दोघंही इन्फ्लुएन्सर आहेत. सुरुवातीला रोमँटिक सुरु असलेली गोष्ट नंतर भयावह वळण घेते. पाण्यात दोघंही कॅमेऱ्यासमोर बोलत असतात तेवढ्यात तिथे मगरही येते. हा भयावह सीन पाहून धडकीच भरते. शनाया ते दृश्य पाहून जोरात ओरडते. एवढाच तो टीझर आहे. शनायाच्या एवढ्याच सीनवरून चाहते प्रभावित झालेत. शनायाने टीझर इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. 'प्रेम, दहशत आणि कोलॅब खूपच चुकीच्या दिशेने गेलं. लाईक, शेअर अँड सर्वाइव्ह' असं कॅप्शन तिने दिलं आहे. 


 यावर सुहाना, भावना पांडे, राघव जुयाल, नव्या नंदा, अजिनी धवन, खुशी कपूर यांनी कमेंट करत तिला शुभेच्छा दिल्या आहेत.
'तू या मै' हा सिनेमा पुढील वर्षी व्हॅलेंटाईन्स डे ला रिलीज होणार आहेत. शनाया कपूरसोबत अभिनेता आदर्श गौरव मुख्य भूमिकेत आहे. ही फ्रेश जोडी पडद्यावर दिसणार आहे. आनंद एल राय यांनी सिनेमाची निर्मिती केली असून बिजॉय नाम्बियार यांनी सिनेमाचं दिग्दर्शन केलं आहे. 

Web Title: shanaya kapoor debut movie tu yaa main teaser released starring adarsh gaurav in lead role

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.