'ही तर लेडी संजय दत्त'; शनाया कपूरचा रॅम्प वॉक पाहून नेटकऱ्यांनी केल्या भन्नाट कमेंट
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 18, 2024 15:16 IST2024-02-18T15:15:19+5:302024-02-18T15:16:02+5:30
Shanaya kapoor: शनाया लोकप्रिय स्टारकिड्स पैकी एक आहे. त्यामुळे ती नेटकऱ्यांमध्ये कायम चर्चेत असते.

'ही तर लेडी संजय दत्त'; शनाया कपूरचा रॅम्प वॉक पाहून नेटकऱ्यांनी केल्या भन्नाट कमेंट
सध्या कलाविश्वात कलाकारांपेक्षा त्यांच्या मुलांची म्हणजेच स्टारकिड्सच्या नावाची सर्वाधिक चर्चा रंगत आहे. यात सध्या अभिनेता संजय कपूर आणि महीप कपूर यांची लेक शनाया हिची चर्चा रंगली आहे. शनाया बॉलिवूडमध्ये पदार्पण करण्यापूर्वीच लोकप्रिय झाली आहे. त्यामुळे या ना त्या कारणामुळे ती चाहत्यांच्या चर्चेत येत असते. सध्या सोशल मीडियावर शनायाचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. यात ती रॅम्प वॉक करताना दिसत आहे. परंतु, तिच्या चालण्याची पद्धत पाहून नेटकऱ्यांनी तिला ट्रोल केलं आहे.
मीडिया रिपोर्टनुसार, शनाया लवकरच करण जोहरच्या सिनेमातून इंडस्ट्रीत पदार्पण करणार आहे. त्यामुळे तिच्या आगामी सिनेमाची चाहते प्रचंड वाट पाहत आहेत. मात्र, शनाया सोशल मीडिया आणि काही इव्हेंटच्या माध्यमातून ती सतत चर्चेत येत असते. नुकतंच शनायाने एका फॅशन शो मध्ये हजेरी लावली होती. यावेळी तिने केलेल्या रॅम्प वॉकची नेटकऱ्यांनी खिल्ली उडवली आहे.
काय म्हणाले युजर्स?
'हिला रॅम्पवॉक करता येत नाही', असं एका युजरने म्हटलं आहे. तर, 'ही तर लेडी संजय दत्त आहे', 'अरे..ही संजूबाबा सारखीच चालते', 'रॅम्प वॉक नाही हा तर रोड वॉक झाला', असं म्हणत नेटकऱ्यांनी तिची खिल्ली उडवली आहे.