सुशांतच्या आठवणीत शरद केळकर भावुक, 'त्याचा प्रवास खुपच...'

By ऑनलाइन लोकमत | Published: November 23, 2022 11:41 AM2022-11-23T11:41:07+5:302022-11-23T11:45:26+5:30

जेव्हा मी टीव्हीमध्ये काम करत होतो तेव्हा माझा सेट सुशांतच्या सेटच्या बाजुलाच होता. आम्ही अनेकदा भेटायचो. कोणीही प्रेमात पडेल असाच त्याचा स्वभाव होता.

sharad-kelkar-remembered-late-sushant-singh-rajput-says-he-has-set-an-example | सुशांतच्या आठवणीत शरद केळकर भावुक, 'त्याचा प्रवास खुपच...'

सुशांतच्या आठवणीत शरद केळकर भावुक, 'त्याचा प्रवास खुपच...'

googlenewsNext

पवित्र रिश्ता फेम अभिनेता सुशांत सिंग राजपुतला जाऊन आता २ वर्ष उलटली आहेत. मात्र आजही चाहत्यांना त्याची तितकीच आठवण येते. फक्त चाहतेच नाही तर कलाकारही त्याची सतत आठवण काढतात. टीव्ही असो किंवा सिनेमा, दोन्ही पडद्यावर सुशांतने प्रचंड यश कमवले होते. तेही कोणाशी ओळख नसताना त्याने मेहनतीने नाव कमावले.अनेक टीव्ही अभिनेत्यांसाठी आजही सुशांतच प्रेरणास्थानी आहे. हर हर महादेव फेम अभिनेता शरद केळकर नेही नुकतेच एका मुलाखतीत सुशांतची आठवण काढली आहे.

काय म्हणाला शरद केळकर ?

शरद केळकर म्हणतो, 'सुशांतने टीव्ही आणि सिनेमा दोन्ही क्षेत्रात अप्रतिम काम केले आहे. सुशांतसारखा बहुगुणी अभिनेता इंडस्ट्रीला मिळाला होता. स्वत:ला सिद्ध करण्यासाठी सुशांत नेहमीच धडपड करायचा. एक टीव्ही अॅक्टर सिनेमात येऊन कसे यश मिळवू शकतो याचे उत्तम उदाहरण म्हणजे सुशांत सिंग राजपुत आहे आणि त्याने हे प्रत्येकाला दाखवून दिले आहे. टीव्ही ते सिनेमा हा त्याचा प्रवास खुपच प्रेरणादायी आहे.'

शरद पुढे म्हणाला, 'जेव्हा मी टीव्हीमध्ये काम करत होतो तेव्हा माझा सेट सुशांतच्या सेटच्या बाजुलाच होता. आम्ही अनेकदा भेटायचो. कोणीही प्रेमात पडेल असाच त्याचा स्वभाव होता. त्याला करिअरमध्ये नेहमीच काहीतरी वेगळे करायचे होते आणि ते त्याने करुन दाखवले.

अभिनेता शरद केळकरनेही अभिनय क्षेत्रातील सुरुवात टेलिव्हिजनमधुन केली होती. २००४ मध्ये 'आक्रोश' या दुरदर्शनवरील मालिकेतुन त्याने अभिनय क्षेत्रात पदार्पण केले होते. 
 

Web Title: sharad-kelkar-remembered-late-sushant-singh-rajput-says-he-has-set-an-example

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.