​‘भूमी’मध्ये शरद केळकर साकारतोय खलनायक

By ऑनलाइन लोकमत | Published: February 2, 2017 02:28 PM2017-02-02T14:28:56+5:302017-02-02T19:58:56+5:30

अभिनेता शरद केळकर संजय दत्तच्या आगामी भूमी या चित्रपटात खलनायकाच्या भूमिकेत दिसणार आहे. भूमीची कथा रिवेंजवर आधारित असल्याने या ...

Sharad Kelkar is a villain in the 'Land' | ​‘भूमी’मध्ये शरद केळकर साकारतोय खलनायक

​‘भूमी’मध्ये शरद केळकर साकारतोय खलनायक

googlenewsNext
िनेता शरद केळकर संजय दत्तच्या आगामी भूमी या चित्रपटात खलनायकाच्या भूमिकेत दिसणार आहे. भूमीची कथा रिवेंजवर आधारित असल्याने या चित्रपटातील खलनायकाचे पात्र महत्त्वाचे मानले जात आहे. शरद केळकरने ही भूमिका साकारण्याचे आव्हान स्वीकारले आहे. कारागृहातून सुटल्यावर संजय दत्तचा हा पहिला चित्रपट ठरणार आहे. 

ओमंग कुमार दिग्दर्शित भूमी या चित्रपटाची कथा बाप-लेकीच्या संबधावर आधारित आहे. शरदला देण्यात आलेल्या भूमिकेबाबद दिग्दर्शक ओमंग कुमार म्हणाला, शरद हा चांगला अभिनेता आहे, तो आपल्या मनातील भावना अतिशय योग्य प्रकारे प्रकट करण्यात सक्षम आहे, त्याची देहबोली ही या चित्रपटातील खलनायकाला जिंवत करेल. भूमी मधील नकारात्मक भूमिकेसाठी त्याची निवड आम्हाला योग्य वाटली. मला असा अभिनेता हवा होता जो भयावहता दाखवू शकेल. मला वाटते शरद हे काम चांगल्या प्रकारे करेल. ही त्याच्यासाठी चांगली संधी आहे. 



भूमी या चित्रपटात अदिती राव हैदरी संजय दत्तच्या मुलीची भूमिका साकारत आहे. माहितीनुसार संजय दत्तने या चित्रपट पूर्ण होईपर्यंत दारूला स्पर्श करणार नसल्याचे ठरविले आहे. तो शूटिंग दरम्यान दारूचा एकही पेग पिणार नाही. या चित्रपटाच्या शूटिंगनंतर तो दारू पूर्णपणे सोडणार आहे असेही सांगण्यात येते. भूमीची शूटिंग २९ जानेवारी २०१७ पासून आग्रा येथे सुरू होणार आहे. २९ हा संजू बाबाचा लकी नंबर असल्याने या दिवशी चित्रपटाचा मुहूर्त केला जाणार आहे. 
२०१७ साली संजय दत्त नव्याने आपल्या करिअरची सुरुवात करणार असल्याने त्याचे चाहते आनंदी आहेत. या शिवाय राजकुमार हिरानी संजय दत्तवर बायोपिक तयार करीत असल्याचे सांगण्यात येत आहे.  विधू विनोद चोप्रा यांच्या आगामी चित्रपटात तो महत्त्वाची भूमिका साकारणार आहे. हा चित्रपट या वर्षाच्या शेवटी प्रदर्शित केला जाईल. 

Web Title: Sharad Kelkar is a villain in the 'Land'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.